केंद्र सरकार अजित पवारांना एव्हढे का घाबरले?

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे देहूच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांना बोलू न दिल्याने केंद्र सरकार विरोधात आंदोलन झाले.
केंद्र सरकार  अजित पवारांना एव्हढे का घाबरले?
NCP agitaion at Deola, Ajit Pawar Latest Marathi News, Pune NewsSarkarnama

देवळा : देहू (पुणे) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) बोलले. मात्र उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना बोलू दिले नाही. पंतप्रधान आणि भाजप पवार यांना एव्हचीढे का घाबरले, की त्यांना भाषणही करू दिले नाही. ही सबंध महाराष्ट्राची अवहेलना झाली, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांनी केली. (BJP insulted Maharashtra in PM`s Pune Programme)

NCP agitaion at Deola, Ajit Pawar Latest Marathi News, Pune News
काँग्रेस नेता आता पेटलाय... मंत्री धडकले राजभवनावर

देहूत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्याने, तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेल्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारविरोधात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांना निवेदन देण्यात आले. (Ajit Pawar Latest Marathi News)

NCP agitaion at Deola, Ajit Pawar Latest Marathi News, Pune News
केंद्राच्या निर्यातबंदीच्या धोरणामुळेच कांदा उत्पादक संकटात आले

पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवस्मारक परिसरात ज्येष्ठ नागरिकांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला. तालुक्यातील महालपाटणे येथील खेळाडूंना जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उषा बच्छाव यांच्याकडून खेळाचे साहित्यवाटप करण्यात आले.

वाढती महागाई, ओबीसी आरक्षण व विरोधी पक्ष करीत असलेली जनतेची दिशाभूल, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, केंद्रातील सत्तेतील पक्षाच्या नेत्यांकडून महिलांविषयी वारंवार अपमानित करण्यात येणारे कृत्य व विविध वक्तव्य अशा प्रवृत्तीच्या वागणुकीविषयी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पाचकंदील येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत शिरसाठ, बाजार समितीचे संचालक जगदीश पवार, शहराध्यक्ष दिलीप पाटील, महिला अध्यक्षा उषाताई बच्छाव, नगरसेविका ऐश्वर्या आहेर, नगरसेवक संतोष शिंदे, वनिता शिंदे, वैशाली खोंडे, सचिन सूर्यवंशी, मनोज गुजरे, आकाश थोरात, चिंतामण आहेर, दत्तू आहेर, साहेबराव सोनजे, मनोहर खैरनार आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in