Chandrakant Patil; चंद्रकांत पाटील तुमचा `डीएनए` कोणता हो?

चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर भाजप गप्प बसते याचा संताप वाटतो.
Chandrakant Patil & Dilip Khaire
Chandrakant Patil & Dilip KhaireSarkarnama

नाशिक : भाजप (BJP) नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महात्मा फुले यांसह काही राष्ट्रपुरुषांविषयी जे विधान केले त्यांचा राज्यभरात (Maharashtra) निषेध होत आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांना हे माहित नसावे, की महात्मा फुले (Mahatma Phule) तत्कालीन काळात अतीशय संपन्न होते. त्यांच्याबाबत अशी विधाने करणाऱ्या पाटील यांचा `डीएनए` तपासण्याची गरज आहे, अशी संतप्त प्रतिक्रीया अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे (Samata Parishad) उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे (Dilip Khaire) यांनी व्यक्त केली आहे. (NCP leader Dilip Khaire deemand a DNA test of Chandrakant Patil)

Chandrakant Patil & Dilip Khaire
Devendra Fadanvis; देवेंद्र फडणवीस ठरले समृद्धीचे यशस्वी कॅप्टन!

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले यांसह राष्ट्रपुरूषांबाबत अतिशय आक्षेपार्ह व अज्ञानमुलक विधान केले आहे. श्री. पाटील हे कोल्हापूरचे व शिक्षक आमदार राहीले आहे. त्यात किती विरोधाभास दिसतो आहे. कोल्हापूर हे छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा सागंणारे व फुले-आंबेडकरांच्या विचारांचा आदर करणारे शहर आहे. दुसरीकडे पाटील हे शिक्षकांचे प्रतिनिधी करत होते. ते कसे शिक्षक असतील?, कोल्हापूरला राहून ते काय शिकले? असा गंभीर प्रश्न पडतो. कारण त्यांना महात्मा फुले यांच्याविषयी काहीही माहिती दिसत नाही. अशा व्यक्तीला भाजपने उच्च शिक्षणमंत्री केले आहे. ही सर्वच स्थिती अत्यंत विरोधाभासाची आहे.

Chandrakant Patil & Dilip Khaire
Abdul Sattar; रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा असे सुचवले होते!

महात्मा फुले यांनी कधीही भीक मागितली नाही, असे श्री. खैरे यांनी सांगितले. ते म्हणाले, अन्य राष्ट्रपुरुषांनीही तसे केलेले नाही. महात्मा फुले यांनी अत्यंत कणखरपणे चंद्रकांत पाटील ज्या प्रतिगामी शक्तींचे नेतृत्व करतात, त्यांच्या विरोधात लढून समाजाला, महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यासाठी पदरमोड केली. अनेक संस्थांना देणग्या दिल्या. त्यातून अनेक संस्था उभ्या राहिल्याव त्यातून एक पुरोगामी समाजाच्या निर्मितीचे बीज रोवले. तत्कालीन परिस्थितीत ते टाटा समुहापेक्षाही अधिक संपत्ती असलेले अग्रणी होते. तो पैसा त्यांनी समाजासाठी खर्च केला. असे असताना फुले यांनी भीक मागीतली असे विधान करणे म्हणजे श्री. पाटील यांनी अज्ञान प्रकट केले आहे.

श्री. खैरे म्हणाले, पाटील यांनी यापुर्वीही `आई-वडिलांचा अपमान सहन करा, मात्र पंतप्रधान मोदींचा अपमान सहन करणार नाही` असे म्हटले होते. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीचा निकाल विरोधात लागल्यास हिमालयात जाईन असे त्यांनी म्हटले होते. आता खरोखरच तुम्ही आता हिमालयात जाण्याची वेळ आली आहे, कारण महाराष्ट्राची जनता तुमच्या विधानांनी अत्यंत संतप्त झाली आहे. विशेष म्हणजे भाजपने पाटील यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांची वकिली करण्याचे काम सुरु केले आहे. याचा अत्यंत खेद वाटतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com