Dhule News: धुळे जिल्ह्यातून जयकुमार रावल,अमरिशभाई पटेल यांची संधी हुकली!

धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतून कोणत्या आदिवासी नेत्यांला संधी मिळणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती.
Jaykumar Rawal & Amrishbhai Patel
Jaykumar Rawal & Amrishbhai PatelSarkarnama

धुळे : राज्याच्या (Maharashtra) मंत्रिमंडळात धुळे (Dhule) जिल्ह्यातून माजी मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) किंवा आमदार अमरिशभाई पटेल (Amrishbhai Patel) आणि साक्रीच्या आमदार मंजुळा गावित (Manjula Gavit) यांची नावे चर्चेत होती. या तिघांनीही त्यासाठी प्रयत्न केले. मात्र मंत्रीमंडळ विस्ताराच्या यादीत पटेल, रावल दोघांची संधी हुकली. त्यामुळे त्यांना पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारात संधी मिळेल का, याची चर्चा सुरु झाली आहे. ( Will heavyweight leaders lobbing for minister`s portfolio in Shinde Government success)

Jaykumar Rawal & Amrishbhai Patel
Jalgaon News: मंत्रीपदासाठी खानदेशच्या नेत्यांचे एकनाथ शिंदेकडे लॅाबिंग

अमरिशभाई पटेल यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे धुळे जिल्ह्यात मोठे वजन आहे. शिरपूर तालुक्यात त्यांनी लोकोपयोगी केलेले कार्य हे एक मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या मंत्रिपदामुळे भाजपला खानदेशात मोठा फायदा होण्याची शक्यता असल्याने त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Jaykumar Rawal & Amrishbhai Patel
Shivsena News: या पुढची प्रत्येक लढाई आपल्याला जिंकायची आहे!

नंदुरबार जिल्ह्यातून माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. आदिवासी कल्याणमंत्री म्हणून त्यांचे नाव अग्रेसर आहे; परंतु भाजपतर्फे सध्या तरी त्यांना कोणताही निरोप नसल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे साक्रीच्या आमदार मंजुळा गावित या सध्या एकमेव महिला आमदार आहेत. शिवाय त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिल्यामुळे महिला म्हणून त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

मंजुळा गावित मुंबईला

आमदार मंजुळा गावित यांना सोमवारी तातडीने मुंबईत दाखल होण्याची सूचना मुख्यमंत्री शिंदे गटामार्फत आल्याने जिल्ह्यातून त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत चर्चेला उधाण आले. जिल्ह्यातून माजी मंत्री तथा भाजपचे नेते अमरिशभाई पटेल, माजी मंत्री तथा नेते जयकुमार रावल, नंदुरबार जिल्ह्यातून माजी मंत्री व नेते डॉ. विजयकुमार गावित यांच्यापैकी कुणाची मंत्रिमंडळात वर्णी लागते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

असे असताना आमदार सौ. गावित यांना मुंबईत तातडीने दाखल होण्याची सूचना मिळाल्यानंतर त्या रवाना झाल्या आहेत. मुंबईत नेत्यांनी नेमके कशासाठी बोलविले हे मात्र गुलदस्त्यात असल्याचे सौ. गावित यांच्यामार्फत सांगण्यात आले. मुंबईत दाखल झाल्यानंतरच वस्तुस्थितीचा उलगडा होऊ शकेल, असे गावित समर्थकांकडून सांगण्यात आले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com