
Srigonda News : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. अहमदनगरच्या श्रीगोंदे बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांमध्ये अभुतपुर्व उत्साह आज पाह्याला मिळाला. श्रीगोंदे बाजार समितीच्या निवडणुकीत तब्बल ९८ टक्के मतदान झाले.
बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीचे मतदान शहरातील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात शांततेत पार पडले. सकाळपासूनच मतदारांची गर्दी मतदान केंद्रावर पाहायला मिळाली. दुपारनंतर मतदारांचा उत्साह कमालीचा वाढल्याने मतदारांसह कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी झाली होती.
या निवडणुकीचे सर्वात विशेष म्हणजे मतदानासाठी येणारा मतदार हा दोन्ही बाजूंच्या नेत्यांशी हस्तांदोलन करताना खुशीत वाटत होता. एरव्ही असे चित्र दिसत नाही. आमदार बबनराव पाचपुते व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची एकत्र आघाडी होती. त्यांच्याविरोधात माजी आमदार राहुल जगताप, बाळासाहेब नाहाटा व साजन पाचपुते एकत्र होते.
दरम्यान, ही निवडणूक चुरशीची असताना व्यापारी मतदारसंघातील पाचपुते-नागवडे गटाचे उमेदवार लौकिक मेहता व आदिक वांगणे यांनी निकालापुर्वीच गुलाल उधळला.
झालेले मतदान व मतदारसंघ
सेवा संस्था मतदारसंघ - एकूण मतदान २ हजार ११५, झालेले मतदान २ हजार ७१
ग्रामपंचायत मतदारसंघ - एकूण मतदान ७९५, झालेले मतदान ७८५
व्यापारी मतदारसंघ - एकूण मतदान २८७, झालेले मतदान २७९
हमाल मापाडी मतदारसंघ - एकूण मतदान १०५, झालेले मतदान १०५
एकूण मतदान ३ हजार ३०२, झालेले मतदान ३ हजार २४० (९८ टक्के)
Edited By- Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.