महापालिका बैठकीतील काजू- बदाम कोण ढापतयं?

सिडकोवासीयांमध्ये रंगतेय महापालिकेतील नगरसेवकांच्या बैठकांतील खुमासदार चर्चा
NMC Building

NMC Building

Sarkarnama

नाशिक: दर महिन्याला होणाऱ्या महापालिकेच्या (NMC) सिडको विभागीय कार्यालयातील प्रभाग सभेत नगरसेवक व अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नाश्त्यातील उरलेले ड्राय फूडस् (काजू, बदाम, पिस्ते व मनोके) नेमके कोण ‘ढापतयं’, याबाबत सिडकोवासीयांमध्ये (Cidco) खुमासदार चर्चा सध्या रंगू लागली आहे.

<div class="paragraphs"><p>NMC Building</p></div>
मालेगाव स्फोटात गौप्यस्फोट; माजी IPS अधिकाऱ्याचे आर आर पाटलांकडे बोट!

नागरिक घरपट्टी, नळपट्टी आदी विविध कर रूपात महापालिकेला पैसा अदा करतात. त्या पैशातून महापालिकेचे कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पगार, विविध विकासकामे आदीतून संपूर्ण अर्थचक्र फिरत असते. मात्र, याच जनतेच्या पैशातून बहुतांश ठिकाणी उधळपट्टीही होताना दिसते. त्यावेळी मात्र जनता गप्प बसत नाही. अशाच एका कारणावरून सध्या सिडकोवासीयांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

<div class="paragraphs"><p>NMC Building</p></div>
शिवसेना म्हणते, कंत्राटदाराचे २८ कोटी रुपये देऊ नका?

त्याचे झाले असे, की दर महिन्याला सिडको विभागीय कार्यालयात प्रभाग सभा होते. या वेळी नगरसेवक आपापल्या प्रभागातील समस्यांचा पाढा वाचतात. त्यावरून उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना धारेवरही धरतात, असे एकंदरीत बघायला मिळते. ही सभा कधीकधी तासन्‌तास चालते. त्यामुळे या ठिकाणी उपस्थितांना चहा, नाश्त्याची व्यवस्था करण्यात येते. पूर्वी नाश्त्यात समोसा दिला जात होता. कालानंतराने एका लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार काजू, बदाम, पिस्ते, मनोके व बिस्कीटची व्यवस्था करण्यात आली. साहाजिकच त्यास कोणी फारसा विरोधही केला नाही. या गोष्टीचे सर्वांनी स्वागतच केले. तेव्हापासून आतापर्यंत सर्वांना ड्रायफूट व चहा दिला जातो.

नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या संख्याबळानुसार ड्रायफूट मागविण्यात येतात. बहुतांशी वेळा यातील काही नगरसेवक व अधिकारी अनुपस्थितही राहतात. त्यामुळे दर सभेला ड्रायफूड उरून राहतात. त्यामुळे उरलेले ड्रायफूड जातात तरी कोठे, असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित होऊ लागला आहे. नुकत्याच सरत्या वर्षात डिसेंबर महिन्यात झालेल्या प्रभाग सभेत बहुतांशी नगरसेवक व अधिकारी अनुपस्थित राहिल्याने मोठ्या प्रमाणात ड्रायफूड उरले होते. त्यामुळे ते उरलेले ड्रायफूट गेले तरी कोठे, याचा शोध सुरू असून, याबाबतची खुमासदार चर्चा आता सिडको परिसरातील नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com