भाजपला रसद कोण पुरवतेय हे राज्य सरकारने शोधले पाहिजे!

जिल्हा परिषदेची व पंचायत समितीची पोटनिवडणूक भाजपनं पैशांच्या जोरावर जिंकली.
Abdul Sattar, Minister
Abdul Sattar, MinisterSarkarnama

धुळे : जिल्हा परिषदेची व पंचायत समितीची पोटनिवडणूक भाजपनं पैशांच्या जोरावर जिंकली. (BJP wins ZP election with money power) त्यांना एवढी मोठी रसद कोण पुरवत (Who supply these logostics to bjp state government shall investigate that) हे देखील राज्य सरकारच्या माध्यमातून बघन आवश्यक आहे, असे राज्याचे महसूल मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले.

राज्याचे महसूल मंत्री अब्दुल सत्तार हे सोमवारी धुळे दौऱ्यावर होते. यादरम्यान मंत्री सत्तार यांच्या हस्ते नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री सत्तार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपल्या भाषणात त्यांनी भारतीय जनता पक्षावर चांगलीच टिका केली. ते म्हणाले, हा पक्ष फक्त राजकारण करतो. प्रत्येक चांगल्या कामाला, जनतेच्या हिताच्या विषयाला विरोध करतो. त्यातून तो सतत जनतेत बुद्धीभेद करत असल्याचे त्यांच्या एकंदर राजकीय वाटचालीत दिसून आले आहे.

Abdul Sattar, Minister
आता फक्त मोदींच्या खुर्चीचा लिलाव बाकी आहे!

ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारमधील काही माल आलेले लोक खाली आलेत आणि गावा गावात फिरू लागले. आपण देखील यांची चौकशी लावली पाहिजे. भाजपचे जर सरकार केंद्रात आहे तर आपले देखील सरकार राज्यात आहे. त्यामुळे यांची देखील चौकशी आपण लावली पाहिजे. भाजपची जिरवायची असेल तर राज्य सरकारने देखील यांची चौकशी लावलीच पाहिजे.

Abdul Sattar, Minister
परमबीर सिंगांच्या नाशिकमध्ये जमिनी?; सिन्नरला नवा गुन्हा दाखल

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, भाजप आपल्यावर सुडाचे राजकारण यासाठी करीत आहे की पहाटे शपथविधी झाल्यानंतर देखील त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले असल्याचा राग त्यांच्या मनात आहे. आणि त्यामुळेच भाजप कडून सुडाचे राजकारण सुरू असल्याच सत्तार यांनी बोलताना स्पष्ट केले.

मंत्री सत्तार यांच्या भाषणादरम्यान स्टेजवर एका कुत्र्याचे पिल्लू आले. त्याबाबत सत्तार यांनी त्याकडे बघत हे आपल्या पक्षाच नाही, आपण काय बोलत आहोत हे ऐकण्यासाठी त्याला पाठवलं असेल, असा टोला सत्तार यांनी लगावला. त्यावर कार्यकर्त्यांमध्ये एकच हाशा पिकला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com