ज्यांनी इंग्रजांची सत्ता उलथवली; तेच सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना धडा शिकवतील... शरद पवार

संकटातील crisis प्रत्येकाच्या मदतीस धावून जाणे run to help ही राष्ट्रवादीची संस्कृती Nationalist culture असल्याचे त्यांनी सांगितले.
MP Sharad Pawar
MP Sharad Pawarsarkarnama

धुळे : ज्या देशातील सर्वसामान्य जनतेने महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन इंग्रजांची सत्ता उलथवून टाकली. त्या देशातील सर्वसामान्य माणसात देशात सत्तेचा गैरवापर करून दमदाटीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांनाही धडा शिकविण्याची ताकद आहे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

धुळे महापालिका इमारतीच्या उद्‌घाटन प्रसंगी शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसावे लागेल. त्यानंतर राष्ट्रवादीने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नुकताच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिंदे व फडणवीस सरकारकडे केली आहे. संकटातील प्रत्येकाच्या मदतीस धावून जाणे ही राष्ट्रवादीची संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले.

MP Sharad Pawar
Jitendra awhad : शरद पवार यांनी आव्हाडांना एकटे पाडलयं ?

ते म्हणाले, लोकांशी सुसंवाद करणे, त्यांच्याशी बोलून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाची शक्ती वापरावी, यासाठी आमचे हे दौरे सुरू आहेत. गेली पाच ते सहा दिवस अनेक भागात अतिवृष्टी झालेली आहे. गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, नागपूर येथे मोठे नुकसान झाले आहे. पिके गेल्याने लोक संकटात आहेत.

MP Sharad Pawar
BJP: आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाजपला दे धक्का!

त्यामुळेच विरोधीपक्ष नेते अजित पवार या भागाचा दौरा करून शेतीच्या बांधावर जाऊ पिकांची पहाणी करत असून राज्य सरकार आणि अधिकाऱ्यांना काय काळजी घ्यायची याची सूचना करत आहे. हाच दृष्टीकोन सर्वांनीच ठेवला पाहिजे. राष्ट्रवादीचे हेच वैशिष्ट असून संकट आल्यावर आमचा कार्यकर्ता मागे राहात नाही. त्यामुळे लोकांनाही माहिती झालं आहे, संकट आले की कुठे जायचं तर राष्ट्रवादीकडे हे हीच आमची जागा आहे.

MP Sharad Pawar
शिवसेना फोडायला मदत करू का : नितेश राणेंची शिंदेंकडे अशीही विचारणा

एक काळ होता की इंग्रजांचे संपूर्ण जगावर राज्य होते. अशात इंग्रजांच्या साम्राज्यावरील सुर्य कधीच मावळत नाही, असं बोललं जात होते. मात्र, आमच्या देशात महात्मा गांधींसारख्या नेतृत्वाने सर्व सामान्यांना त्यांच्याविरोधात संघटीत केले. इंग्रजांचे साम्राज्य १९४७ मध्ये गेलं. देशातील सामान्य माणूस इंग्राजांचा पराभव करू शकता हा इथला इतिहास आहे. त्या देशात सत्तेचा गैरवापर करून दमदाटीचे वातावरण कोणी करत असेल तर त्यांना सुद्धा धडा शिकविण्याची ताकद सर्वसामान्य माणसात आहे, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

MP Sharad Pawar
धुळे शहराला अमृत योजनेंतर्गत २५० कोटी द्यावे

ज्या राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणत्याही निवडणुकाघेण्यासाठी दोन वर्षे सह्या केल्या नाहीत. पण, सत्ता बदलली आणि राज्यपालांनी निवडणूक लावली. एका वर्षात एक आणि दुसऱ्या वर्षात दुसरा निर्णय घेतात यातून राज्यपालांसारखा व्यक्ती अशी भूमिका घेत असेल तर लोकशाहीवर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in