जो जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश होवो!

औरंगाबाद येथील सभेग गुलाबराव पाटील यांनी भाजपचा समाचार घेतला.
जो जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश होवो!
Gulabrao Patil Shivsena leaderSarkarnama

औरंगाबाद : हल्ली काही लोक शिवसेना (Shivsena) संपावायला निघाल्याच्या वल्गना करीत आहेत. त्यांचा खापर पनजोबा आली तरी शिवसेना संपणार नाही. कारण शिवसेना हा एक विचार आहे. जो जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश होवो, या शब्दांत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आज कोणाचेही नाव न घेता राजठाकरे व भाजपवर (BJP) टिका केली.

Gulabrao Patil Shivsena leader
शरद पवारांना धमकावणारा निघाला नाशिकचा निखिल भामरे!

मुंबईत वांद्रे कुर्ला कॅाम्प्लेक्स आवारात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी विविध नेते उपस्थित होते. राज्य मंत्रीमंडळातील विविध सहकाऱ्यांची भाषणे झाली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहेमीच्या आक्रमक शैलीत भाषण केले.

Gulabrao Patil Shivsena leader
शिवसेनेच्या `धर्मवीर`ची भाजपच्या `काश्मीर फाईल्स`ला टक्कर!

ते म्हणाले, आजवर मी अनेकांना पक्ष बदलताना, पक्ष सोडताना,पक्ष फोडताना व प्रवेश देताना पाहिले आहे. मात्र सध्या देवांना देखील आपल्या पक्षात घेण्याचे प्रकार मी पाहतो आहे. यातील काही आपल्याच जीवावर मोठे झालेले लोक आहेत. त्यांच्यावर मी बोलणार नाही. मात्र शिवसेनेला संपवायला निघालेले स्वतःच संपतील मात्र शिवसेना संपणार नाही. शिवसेना एक राजकीय पक्ष नाही, संघटना नाही तो एक विचार आहे. हा विचार कोणी संपवू शकत नाही. आपण सर्व उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे आहोत. मात्र जोपर्यंत सुर्य, चंद्र ही धरती आहे तोपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तेजस्वी विचार टिकून राहतील. शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार आहेत. शिवसेना संपवणारा माईचा लाल जन्माला यायचा आहे.

श्री. पाटील पुढे म्हणाले, सध्या काही लोक दे दान सुटे गि-हान अशी स्थिती करीत गावो गावी, गल्लो गल्ली फिरत आहेत. कोणाचा जन्म कोणत्या आंदोलनातून झाला हे आपल्या सगल्यांना माहिती आहे. मी जेलमध्ये गेलो. का गेलो हे पोलिस रेकॅार्डला आहे. जो शाखाप्रमुख जेलमध्ये गेला नाही तो शाखाप्रमुखच नाही, असा शिवसेनेचा बाणा आहे. परंतु खरे प्रश्न सोडून उलट सुलट आरोप करण्यात ही मंडळी व्यस्त आहे.

तोतरे, तातरे काय बोलतात

सध्याचे विरोधक कशावरही बोलतात मात्र जनतेच्या प्रश्नवर बोलत नाहीत. शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोलत नाही. शेतकरी हा व्यवस्थेचा पाठीचा कणा आहे. ५२ टक्के रोजगार देणारा शेतकरी आहे. हा शेतकरी रोज मरतो आहे, कारण महागाई व शेतीला लागणाऱ्या साहित्याच्या भाववाढीने त्याला त्रस्त करून सोडले आहे. त्याला लागणारी खते, बियाणे, साहित्य, साधने, वस्तू सगळ्या महागल्या. त्यावर हे तोतरे, तातरे बोलत नाहीत. ते कशावर बोलतात?. या लोकांना धडा शिकवला पाहिजे.

श्री. पाटील यांनी शिवसेना कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जोशाने काम करावे. त्वेषाने विरोधकांचा समाचार घ्यावा. `माग कर नही तर छीन कर` अशी आपली ताकद दाखवली पाहिजे. जो अंगावर येईल त्याला शिंगावर गेतले पाहिजे. असे शिंगावर घेऊनच शिवसेना उभी राहिली आहे. पुढेगेली आहे. आजची गर्दी त्याचे प्रतीक आहे. उद्धव ठाकरे यांची तीच ताकद आहे. त्यामुळे `जो जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश होवो` असा माझा संताप आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.