'साठी बुध्दी नाठी' ; राष्ट्रवादीचा संभाजी भिडेंवर हल्लाबोल

Sambhaji Bhide News| भारतमाता विधवा नाही हे खरे असले तरी आज समाजात महिला सुरक्षित आहेत का? असा सवालही राष्ट्रवादीने भिडे यांना केला आहे.
Sambhaji Bhide News|
Sambhaji Bhide News|

Sambhaji Bhide| नाशिक : संभाजी भिडे यांनी मुंबईत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. शिंदेंच्या भेटीनंतर साम वृत्तवाहिनीच्या एक महिला पत्रकार त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेल्या होत्या. या महिला पत्रकाराला पाहून भिडे म्हणाले की, "आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमाता आहे. भारतमाता विधवा नाहीये. कुंकू लावून या मग तुमच्याशी बोलेन." असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीने चांगलाच समाचार घेतला आहे.

सातत्याने वादग्रस्त विधान करणारे शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे केवळ महिला पत्रकाराने कपाळावर कुंकू लावला नसल्याने चिडले अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी केली आहे.

Sambhaji Bhide News|
सत्तेत असतानाच शिवसेना-भाजप एकत्र येण्याच्या हालचाली सुरु होत्या; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

'साठी बुध्दी नाठी' अशी एक म्हण समाजात प्रचलित आहे. कदाचित याच म्हणीचा प्रत्यय संभाजी भिडेंच्या बाबतीत घडतांना दिसतो. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना संभाजी भिडे भेटायला आल्यावर साम मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने प्रश्न विचारताच आधी तू कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलेन असे वादग्रस्त विधान केले. यावरून महिलांचा चार चौघात अपमान करण्याचा अधिकार भिडेंना कुणी दिला असा प्रश्न शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी केला आहे.

प्रत्येक स्त्री ही भारत मातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही हे खरे असले तरी आज समाजात महिला सुरक्षित आहेत का? केवळ कपाळावर कुंकू लावून त्यांना समाजात सन्मान मिळणार का हा खरा प्रश्न महिलांना विचारण्याची गरज आहे. मुळात कुंकू हे केवळ सौंदर्याचे साधन आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अनेक समाज धुरिणांनी विधवा विवाह प्रथा बंदी, सती जाणे अशा गोष्टी मोडीत काढल्यानंतर कोणी महिलेने कुंकू लावले किंवा नाही लावले याने काहीही फरक पडणार नाही. बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून सिध्द करताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसने समाज प्रबोधनाचा विडा उचलत राज्यात प्रथमच नाशिक शहरात विधवा महिलांना कपाळावर कुंकू आणि जोडवे घालण्याचे काम हाती घेतले असल्याचेही अनिता भामरे यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in