राज्यपालांच्या भूमिकेला भाजपचा पाठिंबा आहे का?

धुळे येथे राज्यपाल भरतसिंह कोश्‍यारी, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला.
Shivsena agitation at Dhule
Shivsena agitation at DhuleSarkarnama

धुळे : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackerey) पक्षाने राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी (Bhagatsingh Koshyari) व भाजपचे (BJP) प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेस प्रतीकात्मक पद्धतीने शेण भरवून निषेध व्यक्त केला. (Shivsena uddhav Thackerey criticised BJP on Governer`s Statement)

Shivsena agitation at Dhule
राज्यपाल हटवा ठराव करणारे `हे` ठरले राज्यातील पहिले गाव!

धुळे शहर व जिल्ह्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याने चांगलेच संतापले आहेत. गेले तीन दिवस विविध शहरांत रोज आंदोलन होत आहे. त्यामुळे हे प्रकरण शांत होण्याची चिन्हे नाहीत.

Shivsena agitation at Dhule
ठेवी परत करण्यासाठी लवकरच पॅकेज देण्याचे आश्वासन

राज्यपाल कोश्यारी संवैधानिक पदावर असताना महाराष्ट्रातील राष्ट्रपुरुषांबाबत वारंवार बेताल वक्तव्य करून राज्यातील जनतेच्या भावना दुखविण्याचे काम करीत आहेत. तसेच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केले. या प्रकाराला भाजपचा पाठिंबा आहे का, संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीला सर्व साधनशुचिता पाळावी लागते, त्यांचे कर्तव्य ते विसरत आहेत, असे शिवसेनेने म्हटले आहे.

या वादग्रस्त वक्तव्यांबाबत शिवसेनेने महापालिकेच्या जुन्या इमारतीसमोर राज्यपाल कोश्‍यारी व भाजपचे प्रवक्ते त्रिवेदी यांच्या प्रतिमेस प्रतीकात्मकरीत्या शेण भरवून निषेध नोंदविला. तसेच राज्यपाल कोश्‍यारी, प्रवक्ते त्रिवेदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, भगवान करनकाळ, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, ललित माळी, भरत मोरे, पिंटुटू शिरसाठ, देवीदास लोणारी आदींचा आंदोलनात सहभाग होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in