राणेंना अटक करण्यास निघालेले सिंघम कुठे गेले?

शिवलंगाबाबत आक्षेपार्ह पोसिट टाकणाऱ्यावर कारवाईसाठी भाजपच्या नितेश राणेंचा मोर्चा
MLA Nitesh Rane with BJP leaders
MLA Nitesh Rane with BJP leadersSarkarnama

नाशिक : शिवलिंगाबाबत समाज माध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पोलिस (police) ठाण्यात तक्रार दाखल करूनही कारवाई न केल्याप्रकरणी मंगळवारी भाजपतर्फे (BJP) जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी सिंघम झालेले नाशिकचे (Nashik) पोलिस अधिकारी कुठे गेलेत?. BJP warns police for action against indecent picture on social media)

MLA Nitesh Rane with BJP leaders
शंभर खून झाल्यावर पोलिस जागे होणार का?

याप्रकरणी २४ तासात संशयितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आमदार नीतेश राणे यांनी दिला. याप्रकरणी दखल न घेतल्यास पुढचा मोर्चा हा शांततेत निघणार नाही, असा इशारादेखील त्यांनी या वेळी दिला.

MLA Nitesh Rane with BJP leaders
रायगडावर गेलेले आमदार मंगेश चव्हाण जमिनीवरच झोपले!

शिवलिंगाबाबत २२ मेस एका संशयित तरुणाने इन्टाग्राम या समाज माध्यमावर आक्षेपार्ह फोटो प्रसिद्ध केले. यातून हिंदू धर्माचा व श्रद्धेचा भावना भडकविण्याचा हा सर्व प्रकार आहे. यातून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होवू शकतो, असे समजल्यानंतर याबाबत काही समाजसेवी संस्था आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मात्र, सदर घटनेला पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही साधी कारवाईदेखील पोलिसांकडून करण्यात आली नाही. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर भाजप, राष्ट्रीय श्रीराम संघ, जय मल्हार क्रांती संघटना, श्री. शिव प्रतिष्ठान आदींसह विविध पक्ष व संस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भालेकर मैदानापासून जनआक्रोश मोर्चा काढला.

मोर्चात आमदार नीतेश राणे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, समाधान आहेर, आकाश बेग, सचिन मुरकुले, गजू घोडके, मनोज राजवाडे आदींसह माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या वेळी आमदार राणेसह सर्व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देत ठोस कारवाई करण्याची मागणी केली. आमदार नीतेश राणे यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्यासोबत चर्चा करत सांगितले, की तक्रार देवूनही साधी कारवाईदेखील करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे सर्व सरकार पुरस्कृत आहे का, असा आरोप करत याप्रकरणी २४ तासात कारवाई करण्याच्या सूचना द्या. सध्याचे पोलिस प्रशासन हे सत्ताधाऱ्यांचे घरगडी बनून बसले असल्याचादेखील आरोप केला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com