मुख्यमंत्र्यांनी देवदर्शन घेण्यात गैर काय?

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली मुख्यमंत्र्यांची पाठराखण.
Dada Bhuse & Eknath Shinde
Dada Bhuse & Eknath ShindeSarkarnama

नाशिक : दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिर्डी (Shirdi) येथे देवदर्शन घेतले. त्यानंतर ते अचानक मिरगाव (ता. सिन्नर) (Sinner) येथे भेट दिली. त्यानंतर काही वेळ त्यांनी येथील बाबांशी खाजगी भेट घेतली. संबंधीत बाबा हे वादग्रस्त असुन जादूटोणा करतात असे बोलले जाते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा वादग्रस्त ठरला. त्यावर टिका होत आहे. मात्र यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मुख्यमंत्र्यांची बाजु घेतली आहे. (Guardian Minister Defend Eknath Khadse on his Sinner Visit)

Dada Bhuse & Eknath Shinde
भाजपच्या नेत्यांनी किती टक्केवारी घेतली ते जाहीर करेन!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डीला साईबाबांचे आणि नंतर मीरगाव येथे ईशान्येश्‍वराचे दर्शन घेत अभिषेकही केला. यात गैर काय आहे. त्यांच्यावर याबबात होणारी टीका अनाठायी असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे.

Dada Bhuse & Eknath Shinde
मुंबई-पुण्यात केल्या त्या चुका नाशिकला करू नका!

मुख्यमंत्र्यांनी ईशान्येश्‍वाराला अभिषेक करत शेतकऱ्यांसाठी प्रार्थना केली. राज्यकारभार चालविण्यासाठी आशीर्वाद मागितले. मात्र काहींना या दर्शनाचेही राजकारण करत टीका करणे अयोग्य आहे असे श्री. भुसे यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यांविषयी ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांसह देशाच्या पूजनीय व्यक्तीबाबत प्रत्येकानेच संयमानेच बोलले पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in