संजय राऊत जे बोलतात, ते कधी सत्य ठरले आहे का?

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी टीका केली.
संजय राऊत जे बोलतात, ते कधी सत्य ठरले आहे का?
Girish Mahajan & Sanjay RautSarkarnama

जळगाव : शिवसेना (Shivsena Leader) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) जे बोलतात ते कधी सत्य ठरले आहे का?. एक रुपयाचाही गैरव्यावहार (Corruption) मी कधीच केलेला नाही. त्यामुळे संजय राऊत यांनी कितीही डरकाळ्या फोडू दे, मी कशालाही घाबरत नाही, असे प्रतिपादन भाजपचे (BJP leader) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले आहे.

Girish Mahajan & Sanjay Raut
रोज महागाई वाढवणाऱ्या केंद्र सरकारला हिसका दाखवा!

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गैरव्यावहाराचा ठपका ठेवला होता. याबाबत लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे ते म्हणाले होते. याबाबत भाजप नेते महाजन यांनी राऊत यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, खासदार राऊत यांच्याबाबत खोटे बोला पण रेटून बोला ही म्हण तंतोतंत लागू पडते. ते नेहेमीच आरोप करतात. मात्र त्यातले काहीही सिद्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे त्यांना किती गांभिर्याने घ्यायचे? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

Girish Mahajan & Sanjay Raut
विरोधकांकडून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न!

आपल्या जामनेर येथील निवासस्थानी ते बोलत होते. याबाबत ते म्हणाले, श्री. राऊत केवळ प्रसिद्धीसाठी बोलतात, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी `मी बेकायदेशीरपणे एक रुपयाही मिळवलेला नाही. कोणतिही जमीन खरेदी केलेली नाही. तसे काही सापडले तर मी भाजपला दान करीन, असे त्यांनी `ईडी`च्या कारवाई नंतर म्हटले होते. आता सर्व कागदपत्र समोर येतील. सर्व चौकशी होईल. तेव्हा सर्व काही जनतेसमोर येईल. त्यामुळे राऊत यांच्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही.

श्री. महाजन म्हणाले, काही तरी असल्याशिवाय `ईडी` कारवाई करेल काय?. राऊत म्हणतात, माझा खून होणार आहे. हे काही तरी बरळल्यासारखे आहे. काहीही भाषा ते वापरतात. त्यांनी आता कितीही बडबड केली तरीही काहीही होणार नाही. कुठलीही सहानुभूती त्यांना मिळणार नाही. त्यांचं सर्व पाप, पुण्य जनतेसमोर आलेले आहे.

महाराष्ट्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही, अशी टिका महाजन यांनी केली. ते म्हणाले, राज्याचा गृहमंत्री, मोठे मोठे पोलिस अधिकारी जेलमध्ये आहेत. अनेक मंत्री जेलच्या वाऱ्या करीत आहे. अनेक अधिकारी चौकशीला सामोरे जात आहेत. पोलिसांच्या बदल्यांचा बाजार मांडला आहे. अतिशय विदारक स्थिती झाली आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.