
मुंबई : मी इथे दोन दिवसांपासून बसलो आहे. तुम्ही सर्व राज्यपालांच्या (Governer) अभिभाषणावर चर्चा करीत आहात. मोठ्या मोठ्या योजनांची माहिती देत आहात. मात्र त्यात आमच्या (Trible) नंदुरबारसाठी (Nandurbar) एक रुपया तरी आहे का?. आम्ही महाराष्ट्रात (Maharashtra) रहात नाही का? असा परखड सवाल शिवसेनेचे (Shivsena) आमदार आमषा पाडवी (Amsha Padvi) यांनी केला. (We also staying in maharashtra not elesewhere)
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत श्री. पाडवी यांनी भाग घेतला. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शहरकेंद्रीत आहेत. त्यात दुर्गम आदिवासींच्या व्यथा, प्रश्न यांना स्थान नाही. या अन्यायाला वाचा फोडली. प्रशासकीय अंमलबजावणीतील त्रुटींचा उल्लेख करीत, या प्रश्नाला वाट करून देत अभिभाषणावर टिका केली. नीलम गोऱ्हे सभापतीपदी होत्या.
श्री. पाडवी म्हणाले, आमच्यावर कसा अन्याय होतो, याची दोन उदाहरणे मांडतो. आमच्या भागात तापी नदीवर दोन प्रकल्पांचे भूमीपुजन एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत झाली होते. त्यात प्रकाशा सिंचन प्रकल्पाचा समावेष आहे.
हे प्रकल्प झाले मात्र नंदुरबार व आमच्या दुर्गम भागातील आदिवासी व शेतकऱ्यांना एक थेंब देखील पाणी मिळालेले नाही. सर्व पाणी तापी नदीतून शेजारच्या राज्यात वाहून जाते. आदिवासी शेतकऱ्यांना काहीही मिळत नाही. ही स्थिती केव्हा सुधारणार, असा प्रश्न त्यांनी केला.
आमच्या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात कुपोषण आहे. मुलांना अंगणवाडीद्वारे पोषण आहार दिला जातो. मात्र तो कंत्राटदारांद्वारे दिला जातो. योग्य आहार मिळतो की नाही, हे सरकारने पाहिले पाहिजे. ठेकेदार चांगला आहार देत नाही. त्यामुळे कुपोषण वाढते.
अंगणवाडी सेविका या मुलांना आईसारखे सांभाळतात. त्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांना पुरेसे वेतन मिळत नाही. पेन्शन मिळत नाही. हे काम करणाऱ्यांना पुरेसा मोबदला मिळत नाही. त्यांना शासनाच्या रोजगार हमी योजनेत समाविष्ट करा.
ते म्हणाले, आमच्या भागात काम नाही. लोकांचे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. गरोदर मातांना दहा-बारा किलोमीटर डोली करून न्यावे लागते. अनेकदा गरोदर मातांना खुप सोसावे लागले. तुम्ही मुंबईसाठी अब्जो रूपये खर्च करतात, मग या भागाचाही विचार करा. आम्ही देखील महाराष्ट्रातच राहतो ना?.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.