`अहो मिडियाला कळते ते तुम्हाला का कळत नाही`

आदित्य ठाकरे यांनी शिदवाडी (ता. इगतपुरी) येथील आदिवासी बांधवांशी स्थानिक समस्या जाणून घेतल्या.
Aditya Thakre with Tribles of Iagatpuri
Aditya Thakre with Tribles of IagatpuriSarkarnama

नाशिक : तुम्ही तर सरकारी (Government) नोकरी करता. लोकांचे प्रश्न समजून घेणे हे तुमचे काम आहे. मग महिव्यापूर्वी विहिर कोरडी झाली. ग्रामस्थांना प्यायला पाणी (Water scarcity) नाही. हे मिडियाला (Media) कळते. ते तुम्हाला का कळत नाही?, या संतप्त शब्दांत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांनी सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. (Aditya Thakre angree on Government employees for inafficeency)

Aditya Thakre with Tribles of Iagatpuri
केतकी चितळे विरोधात कळव्यात पहिला गुन्हा दाखल; पोलिस आजच ताब्यात घेण्याची शक्यता

एरव्ही शांत, संयमी अशी प्रतिमा असलेले आदित्य ठाकरे या भागातील पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या कळल्यावर मंत्रालयातून थेट आदिवासी भागात आले. रणरणत्या उन्हात मोरडा गावाला भेट देऊन पाहणी केली. सुविधांची वाणवा असलेल्या येथील आदिवासी नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ते शिदवाडी व डहाळेवाडी (ता. इगतपुरी) येथील आदिवासी बांधवांसमवेत जमिनीवर बसून चर्चा केली. त्यांची ही तळमळ पाहून आदिवासीही आवाक झाले.

Aditya Thakre with Tribles of Iagatpuri
सोलापूरकरांनो, गैरसमज करून घेऊ नका; ‘ती’ योजना जुनीच : भरणे

यावेळी पाण्याची दुरावस्था पाहून अधिका-यांची चांगलीच खरडपट्टी काढली. मोरडा गावातील विहरीने जानेवारीतच तळ गाठून कोरडी ठाक झाली. तरी प्रशासन कानाडोळा करीत आहेत. पाणी टंचाई पत्रकार, मिडियाला अगोदरच माहीत होते. हिच बाब त्या गावातील ग्रामसेवक, तलाठी, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना का माहिती होत नाही, असा प्रश्न त्यांनी केला.

त्यानंतर त्यांनी इगतपूरी तालुक्यातील खंबाळे हद्दीतील शिदवाडी गावाला भेट दिली. आदिवासी बांधवांसोबत संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. या वेळी पाणीपुरवठा योजना, सिंचन व पर्यावरणाच्या बाबतीत आढावा घेऊन प्रस्तावित नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती देण्याच्या सूचना देऊन वर्षभरात योजनेचे काम पूर्ण करण्याचे आदेश आदित्य ठाकरे यांनी आजच्या भेटीप्रसंगी दिले.

या वेळी सध्याची पिण्याच्या पाण्याची स्थिती, स्थानिक समस्या याबाबत थेट महिलांशीच संवाद साधला. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी पाठविले असून, राज्य शासन आपल्याबरोबर आहे याची खात्री बाळगा, असे आश्वासित केले.

या वेळी शिवसेनेचे उपनेते आदेश बांदेकर, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार निर्मला गावित, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, आदी सहभागी झाले होते.

या वेळी सरपंच द्वारका शिदे, उपसरपंच दिलीप चौधरी यांनी विविध समस्या व मागण्यांबाबत श्री. ठाकरे यांना माहिती दिली. तलावातून गाळ काढण्याच्या कामाला पर्यावरण विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही श्री. ठाकरे यांनी दिली.

जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, ग्रामसेवक बी. जी. घडोजे, भगवान आडोळे, विठ्ठल लंगडे, नंदलाल भागडे, रमेश धांडे, नारायण चौधरी, जीवन प्राधिकरण विभागाचे अधीक्षक अभियंता आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com