गुलाबराव पाटील, तुमच्यावर फडणवीसांनी कोणती भानामती आहे?

सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टिका केली.
Sushma Andhare & Gulabrao Patil
Sushma Andhare & Gulabrao PatilSarkarnama

जळगाव : मात्र तुम्ही तीस वर्षे त्यांच्या सोबत होता. मात्र त्यांना सोडून (Leave Shivsena) तुम्ही निघून गेलात. गुलाबराव, (Gulabrao Patil) तुमच्या काळजाला पाझर का नाही फुटला? अशी टीका शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackerey) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (SushamaAndhare) यांनी राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर केली.(Shivsena deputy leader Sushama Andhare criticise Minister Gulabrao Patil)

Sushma Andhare & Gulabrao Patil
Andheri Election : पोटनिवडणुकीसाठी आज मतदान : ऋतुजा लटकेंसह सात उमेदवार रिंगणात!

जळगावात पत्रकारांशी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, गुलाबराव पाटील तुमच्यासारखी सत्तेचा मलिदा खाणारे लोक तीस तीस वर्ष शिवसेनेच्या जिवावर गलेलठ्ठ आणि मस्तवाल झाले. गुलाबभाऊ, तुमच्या काळजाला पाझर का फुटत नाही? गुलाबराव पाटील तुमच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी कोणती करणी, भानामती, काळी जादू केली आहे, ज्यामुळे तुम्ही निगरघट्ट व पाषाण हृदयी झालात.

Sushma Andhare & Gulabrao Patil
राहुल गांधींचा अकोला जिल्ह्यात दोन दिवस मुक्काम; १६ नोव्हेंबरला होणार आगमन...

त्या पुढे म्हणाल्या, मी एकेकाळी शिवसेनेच्या विरोधात टीकाकार होते; मात्र ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कपटकारस्थान करण्यात आले त्या वेळी आमच्यासारख्या टीकाकारांच्या काळजाला पाझर फुटला आणि आम्ही पडत्या काळात त्यांच्या पाठीशी साथ देण्यासाठी उभे राहिलो.

श्रीमती अंधारे म्हणाल्या, जिल्ह्यात पाच आमदार शिवसेनेतून गेले. मात्र आम्हाला त्याचा काही फरक पडला नाही. आमच्याकडे आमदारांमुळे शिवसैनिक नसतात शिवसैनिकांमुळे आमदार असतात. जिल्ह्यातील पाच आमदार व काही गिने चुने टेंडर आणि गुत्तेगिरीतीच्या राजकारणातले त्यांच्या सोबत गेले असतील. मात्र यामुळे जळगावात शिवसेना क्षीण झाली, असे आम्हाला वाटत नाही. जिल्ह्यातील शिवसैनिक तग धरून निष्ठेने उभा आहे तोपर्यंत आम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आदित्य ठाकरे यांची जळगावातील सभा ‘भूतो न भविष्यती’ अशी झाली. सत्ता असताना फुटीर आमदारांना वाय प्लस सुरक्षा घेऊन त्यांना इथे फिरावे लागतं, यातच उत्तर आले.

राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रीमती अंधारे यांना शिवसेनेच्या विरोधी टीकाकार म्हटले होते. त्यावर श्रीमती अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या, एकेकाळी मी टीकाकार होते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही शिवसेनेवर टीका केली, मात्र शिवसेनेच्या पडझडीच्या काळात एकानेही साथ सोडून जाण्याची भाषा केली नाही. मी टीकाकार असूनही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जे कपटकारस्थान झाले, त्यामुळे माझ्या काळजाला पाझर फुटला आणि पडत्या काळात साथ देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहिले. टीकाकारांच्या काळजाला पाझर फुटतो. मात्र गुलाबराव पाटील तुमच्यासारखी सत्तेचा मलिदा खाणारे लोक तीस तीस वर्ष शिवसेनेच्या जिवावर गलेलठ्ठ आणि मस्तवाल झाले. गुलाबभाऊ, तुमच्या काळजाला पाझर का फुटत नाही?

गुलाबराव पाटील तुमच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी कोणती करणी, भानामती, काळी जादू केली आहे, ज्यामुळे तुम्ही निगरघट्ट व पाषाण हृदयी झालात. बहीण म्हणून गुलाबराव, तुमच्या विवेकाला हात घालते. बघा, तुमचा विवेक जागला तर चांगलेच आहे, अशी आर्त हाकही श्रीमती अंधारे यांनी दिली.

यावेळी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, अंकुश कोळी यांनी श्रीमती अंधारे व शरद कोळी यांचे स्वागत केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in