खासदार हेमंत गोडसे यांचे काहीच योगदान नाही!

खासदार गोडसे यांच्या बंडानंतर शिवसैनिकांच्या कडवट प्रतिक्रिया
Hemant Godse & Datta Gaikwad
Hemant Godse & Datta GaikwadSarkarnama

नाशिक रोड : नाशिक (Nashik) लोकसभेचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी बंड केल्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदार संघांतील शिवसैनिकांमध्ये तीव्र भावना उमटत आहेत. खासदार गोडसे पक्ष सोडून गेले तरी आम्हाला काहीाही. पक्षवाढीसाठी (Shivsena) त्यांचे काहीही योगदान नाही. ज्यावेळी पक्षावर संकट आले, त्या वेळी नाशिकचा सामान्य शिवसैनिकच पक्षाच्या बाजूने उभा राहिला आहे. शिवसेनेची ताकद ही सामान्य शिवसैनिकच आहे, अशी भावना सध्या कडवट शिवसैनिक व्यक्त करीत आहे. (Rebel Hemant Godse will not harm shivsena at all)

Hemant Godse & Datta Gaikwad
उद्धव ठाकरेंनी मिठी मारली, तुम्ही पाठीत खंजीर खुपसला!

(स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक बंडखोरांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सदैव उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहू, मोडू पण वाकणार नाही, शिवसेनेची शिकवण मोडणार नाही, असा निर्धार नाशिक लोकसभा मतदारसंघातील कडवट शिवसैनिकांनी केला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. पारंपरिक विक्रम मोडून दुसऱ्यांदा लोकसभा मतदारसंघात निवडून येणाऱ्या खासदार हेमंत गोडसे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात सामान्य शिवसैनिकांमध्ये वेगवेगळ्या भावना उमटू लागल्या आहेत.

Hemant Godse & Datta Gaikwad
खासदार हेमंत गोडसे फुटले, मात्र शिवसैनिक जागचा हलला नाही.

जिल्ह्याच्या राजकारणात देवळाली मतदारसंघ हा शिवसेनेचा आत्मा समजला जातो. खासदार गोडसे यांचे घर असणाऱ्या या मतदारसंघात शिवसेनेचे महत्त्वाचे डझनभर नेते राहतात. शिवसेनेचा नाशिकमधील जन्म १९ जून १९६८ ला ज्या देवळाली मतदारसंघातील देवळालीगाव, भगूर आणि विहितगाव येथे झाला तेथील कडवट शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यासंदर्भात माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड म्हणाले, गोडसेंच्या बंडखोरीचा पक्षाला काहीच तोटा नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. भाजप एकनाथ शिंदे यांचा फक्त वापर करून घेत आहे. शिवसेना पक्ष संपवण्याचा डाव सामान्य शिवसैनिक उधळून लावतील. पक्षावर ज्यावेळी संकटे आली आहेत, त्या वेळी सामान्य शिवसैनिकांनीच पक्षाला उभारी दिली आहे. या वेळीही तसेच होईल.

पुढे होणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याची वेळ आली तरी शिवसेना समर्थ असल्याचे उद्धव ठाकरेंनी माजी आमदारांच्या बैठकीत सांगितले आहे. शिवसेना मोठी करण्यात सामान्य शिवसैनिकाचाच मोठा सहभाग राहिला आहे. त्यामुळे कोणत्याच बंडखोरीचा पक्षाला तोटा होणार नाही. कडवट शिवसैनिक गद्दारांना माफ करणार नाही. आम्ही शिवसैनिक होतो आणि यापुढेही राहू, असे माजी आमदार योगेश घोलप यांनी सांगितले.

योगेश देशमुख म्हणाले, पक्षाच्या अडचणीच्या काळात सामान्य शिवसैनिकच उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहणार आहे. आमचा जन्म शिवसेनेतला आहे. आम्ही शिवसेना संस्कृतीत वाढलेलो असल्यामुळे आमच्या रक्तात बंडखोरी नाही. गोडसे यांच्या बंडखोरीचा शिवसेनेला काहीच तोटा होणार नाही, पक्ष संघटन पुन्हा नव्या जोमाने उभे राहील.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in