अजित पवार यांच्या मोफत विजेच्या घोषणेचे काय झाले?

सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत जागर शेतकऱ्यांचा उपक्रम यासाठी खोत येवला येथे आले आहेत.
अजित पवार यांच्या मोफत विजेच्या घोषणेचे काय झाले?
Sadabhau KhotSarkarnama

नाशिक : देशातील कोरोना (Covid19) संपला आहे. मात्र राज्य सरकारचा (Mahavikas Aghadi Front) कोरोना काही संपत नाही. त्यामुळे रोज विविध अडचणी निर्माण केल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्तेवर आल्यास मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेचे काय झाले? असा प्रश्न रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केला.

Sadabhau Khot
धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे!

श्री. खोत यांच्या उपस्थितीत जागर शेतकऱ्याचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा अभियान सुरू आहे. त्याअंतर्गंत आज ते येवला येथे आले आहेत. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टिका केली. ते म्हणाले, कोरोना काळ संपला असला तरी सरकारचा मात्र अद्याप कोरोना संपत नाही आहे. राज्याच्या सरकारी तिजोरीवर महाविकास आघाडी सरकार दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहे. हा दरोडा लपविण्यासाठी सरकार रोज वेगवेगळे विषय पुढे करीत आहेत.

Sadabhau Khot
सहकाऱ्यांना मागे सोडून पुढे पळणारा मुख्यमंत्री नसावा!

ते पुढे म्हणाले, पीक विमा तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान अद्याप मिळालेले नाही. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दहा हजार रुपये भरणार हे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात दहा हजार तर सोडाच मात्र सरकार आता शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडत आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर श्री. खोत यांनी टिका केली. ते म्हणाले, आमची सत्ता आल्यानंतर आम्ही वीज मोफत देऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. नाही दिले तर आम्ही पवार यांची अवलाद म्हणनार नाही असे बोलले होते. मग आता तुम्ही कुणाची अवलाद आहे हे त्यांनी सांगावे.

राज्य सरकारने कष्टकरी वर्गाची चेष्टा सुरु केली आहे. दूध, कांदा प्रश्न गंभीर झाला आहे. याकडे सरकार लक्ष देत नाही. सरकार विरोधात जे बोलेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. सत्तेत असताना देखील तुम्ही तुडवा, गाडा असे शब्द वापरता. तुम्ही काय औरंगजेब आहे का, असा प्रश्न त्यांनी संजय राऊत यांना केला.

राज्य सरकारने काद्याला ५ रुपये वाहतूक अनुदान दिले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. शेतकरी व कष्टकऱ्यांच्या याच प्रश्नांवर आम्ही ही जागर यात्रा सुरू केली आहे. येत्या १८ मेस माढा (सोलापूर) येथे तीचा समारोप होईल. ते पुढे म्हणाले, राज्य सरकार सध्या बारामती वरून चालतंय. मराठा आरक्षण देखील बारामतीकरानीच घालवलं आहे. मराठा समजाचे वाटोळे या बारामतीकरांनी केले आहे. सबंध राज्याचे वाटोळे या पवार अँड पवार कंपनीने केल आहे. या राज्याला आता पवार यांच्यापासून वाचवण्याची वेळ आली आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.