Jayant Patil Speech : तुम्हाला न विचारताच लाठीजार्च होत असेल तर सरकारमध्ये तुम्ही काय करताय?; जयंत पाटलांचा सवाल

Jalgaon NCP Sabha : तुम्हाला न विचारता पोलिस एखाद्या शांततेत चाललेल्या आंदोलनावर लाठीचार्ज करत असतील, तर हे राज्यातील शेंबड्या पोरालाही पटणार नाही.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

Jalgaon News : ‘तुमचं सरकार आहे, दोन उपमुख्यमंत्री आहेत. तुम्हाला न विचारता पोलिस लाठीचार्ज करत असतील तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार आहे का? तुम्हाला न विचारता लाठीचार्ज झाला तर तुम्ही सरकारमध्ये काय करताय?,’ असे सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जालना जिल्ह्यातील लाठीचार्जवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. (What do you do in government? : Question by Jayant Patil)

जळगाव जिल्ह्यात शरद पवार यांची आज (ता. ५ सप्टेंबर) जाहीर सभा झाली. त्या सभेत जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, तुम्हाला न विचारता पोलिस एखाद्या शांततेत चाललेल्या आंदोलनावर लाठीचार्ज करत असतील, तर हे राज्यातील शेंबड्या पोरालाही पटणार नाही. तुम्हाला न विचारता पोलिसांनी लाठीचार्ज केला असेल तर त्यासारखी दुसरी गंभीर घटनाच नाही. पोलिसांवर आणि कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्यांवर सरकारचं नियंत्रण नाही, हे यावरून सिद्ध होतं.

Jayant Patil
Jalgaon Sabha : सुप्रीम कोर्टाचे दोन निर्णय दोन महिन्यांत फिरवता अन्‌ मराठा आरक्षणासाठी ५० टक्क्यांचे कारण देता; आव्हाडांचा भाजपला सवाल

आज आपण सर्वांनी राजकारणाचा बारकाईने विचार करा. निवडणुकीत डोळसपणाने मतदान करा. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्यापुढे समर्थ पर्याय ठेवू. सर्वांनी ताकदीने सर्व विधानसभा मतदारसंघ उभारा. जळगाव जिल्ह्यात फार पडझड झालेली नाही. तुम्ही सर्व जण एकत्रितपणे जळगाव जिल्ह्यातील सर्वच सर्व आमदार आणि खासदार राष्ट्रवादीचे निवडून येतील. त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

Jayant Patil
Jalna Lathicharge: फडणवीसांची माफी म्हणजे ‘कोणी केलं, काय केलं, हे आता....’ ; लाठीहल्लाप्रकरणी पवारांचे गृहमंत्र्यांकडे बोट

जयंत पाटील म्हणाले की, सरकारने इतर कार्यक्रम बाजूला ठेवून दुष्काळसंदर्भात उपाय योजना केल्या पाहिजेत. शिर्डीत ‘शासन आपल्या दारी’साठी नगर जिल्ह्यातील सर्व एसटी बस बुक करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एसटी नाही, अशी परिस्थिती होती. जळगावमध्ये कार्यक्रमाला या, नाही तर तुम्हाला रेशनचे धान्य मिळणार नाही, असे फर्मानच काढण्यात आले होते. सरकारी पक्षाला माणसं गोळ्या करण्यासाठी अनेक उपदव्याप करावे लागतात, हे दिसते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in