MVP Election: मविप्र संस्थेत बाह्य शक्तींना येऊ देणार नाही!

नीलिमाताई पवार यांनी प्रगती पॅनलच्या मेळाव्यात व्यक्त केला निर्धार
Nilimatai Pawar
Nilimatai PawarSarkarnama

नाशिक : गेल्या दशकात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने (MVP) सतत प्रगतीपथावर वाटचाल करीत अनेक नवी कामे व उपक्रम केले. कोरोना काळात संस्थेच्या मविप्र रूग्णालयाने (Dr. Vasant Pawar Hospital) अनेक अडचणींवर मात करीत हजारो रुग्णांना सेवा दिली. ही प्रगती काही बाह्य शक्तींना सहन होत नाही. त्यांचा संस्थेच्या जमिनींवर डोळा आहे. या बाह्य शक्तीच (Out sider politicians) बुरखा पांघरून परिवर्तनाच्या वल्गना करीत आहेत. मात्र सभासद सुज्ञ आहेत. ते मविप्र समाजात या बाह्य शक्तींना येऊ देणार नाहीत, असा विश्वास प्रगती पॅनलच्या (Pragati Panel) नेत्या नीलिमाताई पवार (Nilimatai Pawar) यांनी व्यक्त केला. (Nilimatai Pawar aggressively blaim opposion candidates in MVP election)

Nilimatai Pawar
Naresh Mhaske : ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी सोपवली नवीन जबाबदारी

चांदोरी येथील कन्यादान मंगल कार्यालय येथे झालेल्‍या प्रचारसभेत ते बोलत होते. जगन नाठे अध्यक्षस्थानी होते. यावेळी श्रीमती पवार म्‍हणाल्‍या, की सध्याची लढाई वैचारिक असून, आपण संस्थेचे काम हे देवकार्य समजून केले आहे. विरोधक केवळ अपप्रचार करीत असून, अकरा खटले या सेवकांच्या विरोधात चालविल्या गेल्या. त्याबाबत सभासदांनी जाब विचारावा, तसेच कर्मवीरांच्या घरातील सभासद केलेले असून, कोणतेही बोगस सभासद केलेले नाही, असे त्‍यांनी स्‍पष्ट केले. केटीएचएम महाविद्यालयाची जागा कोणीही संस्थेला दिलेली नसून, शासनाकडून नजराणा भरून मिळविलेली आहे. त्यासाठी काकासाहेब वाघ यांच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले. विरोधकांनी संस्थेची प्रगती समजावून घेत, मग बिनबुडाचे आरोप करावे, असे त्‍या म्‍हणाल्या.

Nilimatai Pawar
Maharashtra Tet Scam : अपात्र ठरविलेल्या शिक्षकांचे वेतन बंद ; शिक्षण संचालकांचा दणका

सभापती माणिकराव बोरस्ते म्हणाले, संस्थेच्या कार्यकारी मंडळाने एकविचाराने गेल्या पाच वर्षांत उत्कृष्ट कार्य केले आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार संस्‍थेकडून शहरी भागासोबत ग्रामीण भागातही सीबीएसई माध्यमांचे शिक्षण दिले जाते आहे. कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवत, सामान्यांना वैद्यकीय महाविद्यालयातून उपचार देत दिलासा दिला. गटतट न पाहता सर्वांचे काम केले असून, संस्‍थेच्‍या विकासाचे प्रगती पॅनलचे ध्येय असून, कर्मवीरांची अस्‍मिता जपण्यासाठी प्रगीत पॅनलला निवडून द्या, विरोधकांचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, सर्व निफाडकरांना नीलिमाताईंचे हात बळकट करावे, असे आवाहन त्‍यांनी केले.

श्री. बोरस्‍ते म्‍हणाले, की मविप्र संस्था तालुक्याचे वैभव असून, कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी प्रगती पॅनलला निवडून द्यावे. भास्करराव बनकर म्‍हणाले, की डॉ. वसंतराव पवार गेल्यानंतर नीलिमाताई यांनी बारा वर्षांत देदीप्यमान कार्य उभे केले. होरायझनसारखा ब्रँड जिल्ह्यात निर्माण केला.

अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. ढिकले म्‍हणाले, की निफाड तालुका कर्मवीर काकासाहेब वाघ, मालोजीकाका मोगल, दुलाजीनाना पाटील, डॉ. वसंतराव पवार, अॅड. विठ्ठलराव हांडे या कर्मवीरांचा असून, सभासदांनी शिक्षणमहर्षी निर्माण करावे व शिक्षणसम्राटांना दूर सारावे.

प्रगतीला साथ द्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे म्‍हणाले, की कर्मवीरांचे स्वप्न प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम नीलिमाताई, कार्यकारी मंडळाने केले आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातही गुणवंत शिक्षण दिले जाते आहे. स्पर्धेचे युग असल्याने शालेय वातावरण निर्मितीसाठी चांगल्या इमारती व सुखसोई महत्त्वाच्या आहेत. संस्थेच्या दीर्घकालीन नियोजानासाठी मतभेद विसरून ताईंच्या मागे आपली ताकद उभी करा.

यावेळी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. रामचंद्रबापू पाटील, यशवंतबापू अहिरे, श्रीराम शेटे, नीलिमाताई पवार, डॉ. सुनील ढिकले, डॉ. विलास बच्छाव, डॉ. प्रशांत पाटील, मनोहरबापू देवरे, माणिक शिंदे, दिलीप मोरे, दत्ता गडाख, सुरेश कळमकर, प्रल्हाद गडाख, सिंधू आढाव, शंकरराव कोल्हे खेडेकर, डॉ. जयंत पवार, निवृत्ती टर्ले, दिलीप गडाख, शिवाजी खालकर, संतू खेलूकर, शिवाजी गडाख उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in