वाद सरस्वतीचा....आमचे मत पुढेही ठामपणे मांडतच राहू!

छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत मायबोली विद्यालयात जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त कार्यक्रम
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

येवला : फुले, (Mahatma Phule) शाहू, (Chhatrapati Shahu Maharaj) आंबेडकर (Dr. B. R. Ambedkar) यांनी या देशात समाजक्रांती (Social revolution)तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यक्रांती घडवली. ज्या महापुरुषांनी शिक्षणाची कवाडे सर्वांना खुली करून दिली अशा सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन शाळेत झालेच पाहिजे, हे आमचे मत आम्ही पुढेही ठामपणे मांडत राहू असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. (Chhagan Bhujbal firm on his opinion on Goddess sarswati)

Chhagan Bhujbal
Nashik News: शिंदे गटाचे दादा भुसेंनी भाजपला थेट आरोपी केले?

जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त येथील समता प्रतिष्ठान संचालित मायबोली निवासी कर्णबधिर शाळेत विद्यार्थ्यांना वैश्विक ओळखपत्रे वाटप आणि ऑडियोमेट्रिक रूमचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

Chhagan Bhujbal
दादा भुसे, गुलाबराव पाटील संधीचं सोनं करतील का?

सुरुवातीला मूकबधिर मुलांनी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ‘सुंदर ते ध्यान’ या प्रसिद्ध अभंगावर सुंदर नृत्य सादर केले. भुजबळ यांचा महात्मा ज्योतिराव फुले यांचा यांची फुले पगडी आणि घोंगडी देऊन संस्थेचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी सन्मान केला. भुजबळांच्या हस्ते ऑडिओ मॅट्रिक रूमचे आणि प्रसिद्ध अभिनेते निळूभाऊ फुले कलादालनाचे उद्घाटन करण्यात आले.

समतेच्या वाटेवरील साथ

श्री. भुजबळ म्हणाले, समता प्रतिष्ठानने दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळा सुरू होऊन तब्बल २६ वर्ष झाली आहे. यात १२० विद्यार्थी निवासी पद्धतीने शिक्षण घेत आहेत. कोकाटे यांच्या कार्यात अनेक अडचणी येत आहेत, मात्र आम्ही कायमच त्यांच्या पाठीशी उभे राहू. यासाठीच मी वैयक्तिक या संस्थेला २ लाखाची मदत जाहीर करतो, समतेच्या वाटेने जाणाऱ्या प्रत्येकासोबत आम्ही कायमच उभे राहू असेही भुजबळ म्हणाले. ‘आपण सुरू केलेल्या वैचारिक चर्चेमध्ये काही विशिष्ट शक्तीकडून आपल्याला अडविण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते या वैचारिक लढाईत राज्यभर आपल्या सोबत असतील, गरज तिथे छातीचा कोट करतील असे श्री. कोकाटेंनी भुजबळांना सांगितले.

यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार मारोतीराव पवार, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सहकार नेते अंबादास बनकर, समाज कल्याण उपायुक्त भगवान वीर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे, सुधा कोकाटे तसेच विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com