कर्जाचे खड्डे आम्ही भरले, रस्त्याचे खड्डे तर तुम्ही भरा!

भाजप नेते सुरेश भोळे यांचा दूषित पाण्याच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांवर आरोप
कर्जाचे खड्डे आम्ही भरले, रस्त्याचे खड्डे तर तुम्ही भरा!
BJP leader Suresh Bhole News, Jalgaon Latest Marathi NewsSarkarnama

जळगाव : महापालिकेवर (Jalgaon) हुडको, जिल्हा बँक तसेच इतर कर्जाचे मोठे खड्डे निर्माण केले होते. आमच्या सत्ताकाळात आम्ही निधी उपलब्ध करून हे सर्व खड्डे भरून महापालिका (Municiple corporation) कर्जमुक्त केली. आता रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाचा निधीही आणून दिला परंतु महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना रस्त्याचे खड्डेही भरता येईना. जळगावकरांना शुध्द पाणीपुरवठा करण्याबाबतही ते असमर्थ ठरत आहेत. अशी टीका भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे (Suresh Bhole) यांनी केली आहे. (BJP leader suresh Bhole deemands roads repairing)

BJP leader Suresh Bhole News, Jalgaon Latest Marathi News
हिसाळे गणावर पुन्हा भाजपचे वर्चस्व!

जळगाव शहरातील विकास कामाबाबत आमदार सुरेश भोळे यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, की जोड-तोड करून महापालिकेत सत्ता स्थापन केली मात्र त्या वेगाने विकास कामे मात्र केली जात नाहीत. आमची महापालिकेवर सत्ता असताना आम्ही शासनाकडून निधी उपलब्ध करून महापालिकेला कर्जमुक्त करण्याचे कार्य केले. हुडको, जिल्हा बँकेचे कर्ज फेडकरून मोठे आर्थिक खड्डे भरले आहेत. आमच्या सत्ता काळात आम्ही शिवाजीनगर पूल आणि पिंप्राळा पूलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून त्याचे कामही सुरू केले. (Jalgaon Latest Marathi News)

BJP leader Suresh Bhole News, Jalgaon Latest Marathi News
कांदा दरप्रश्‍नी राज्य सरकारला अल्टिमेटम!

निधी उपलब्ध, पण कामात येईना

जळगाव शहरातील रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला आहे. तब्बल ४२ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. परंतु त्याचे कामसुध्दा या सत्ताधाऱ्यांना करून घेता येत नाही. शहरातील सर्वच भागातील नागरिक खड्यामुळे त्रस्त आहेत, परंतु त्यांना साधे रस्त्याचे खड्डे सुध्दा भरता येत नाहीत.

नागरिकांना दूषित पाणीपुरवठा

जळगावकर नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे सांगूत आमदार भोळे म्हणाले, की नागरिकांच्या तक्रारी आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आयुक्तांना याबाबत स्वतंत्र पत्र दिले आहे. शहरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शुध्द पाणीपुरवठा करण्याबाबत आपण तातडीने कारवाई करावी, असेही आपण नमूद केले आहे.

विकासासाठी एकत्र बैठक घ्या

जळगावकर नागरिकांच्या समस्या सुटायला हव्यात, असे मत व्यक्त करून भोळे म्हणाले, की रस्ते दुरुस्ती, दूषित पाणीपुरवठा तसेच स्वच्छतेच्या बाबतीत समस्या असतील आणि त्यात काही अडचणी असतील त्याबाबत चर्चा केली पाहिजे. आम्ही विरोधक असलो तरी त्या समस्या कशा सुटतील याबाबत आम्हीही दक्षता घेऊन यासाठी सत्ताधाऱ्यांनी एकत्र बैठक लावावी, त्यावर चर्चा करून हे प्रश्‍न सोडवावेत असे मतही त्यांनी व्यक्त केले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in