आम्ही फूट पाडलीच नाही, आम्ही बाळासाहेबांचाच विचार पुढे नेतो आहे.

माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले.
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama

जळगाव : दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre) आपले खरे गुरू आहेत. त्यांच्या विचारच्या प्रेरणेने आपण वाटचाल करीत आहोत. त्यामुळे आम्ही फूट पाडली, असे कोणी म्हणत असेल, तर ते चुकीचे आहे. आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊनच पुढील कार्य करीत आहोत, अशा भावनिक शब्दात माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेनाप्रमुख (Shivsena) बाळासाहेब ठाकरे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवारी अभिवादन केले. (Gulabrao Patil says we are on Balasaheb Thakrey`s path)

Gulabrao Patil
दादा भुसे यांना राजन विचारे शिवसेनेत येण्याचे निमंत्रण देतील का?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे गुलाबराव पाटील नतमस्तक झाले. या वेळी ते म्हणाले, की हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत कार्यरत झालो. बाळासाहेब आपले खरे गुरू असून, माझे दैवत आहेत.

Gulabrao Patil
आमदार सुहास कांदेंना धक्का; गणेश धात्रक शिवसेनेचे झाले जिल्हाप्रमुख!

ते म्हणाले, गेल्या ३८ वर्षांपासून एक नेता, एक विचार आणि एक झेंडा यांनाच प्रमाण मानून आपली वाटचाल सुरू असून, भविष्यातही आपण यावरूनच मार्गक्रमण करणार आहोत. राज्यातील बदलत्या राजकीय स्थितीबाबत काही जण आमच्यावर चुकीची टीका करीत आहेत.

ते म्हणाले, आम्ही शिवसेना सोडली, तर नाहीच; पण यात फूटही पाडलेली नाही. उलटपक्षी आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊनच पुढे जात आहोत. गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांच्या विचारांवरून आगामी वाटचाल कायम ठेवण्याचा आम्ही संकल्प करीत आहोत.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in