आम्ही आदिवासी, शरद पवार हे आमचे सेनापती!

घोटी येथे राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले.
Trible leader Satish Pandam
Trible leader Satish PandamSarkarnama

घोटी : स्वातंत्र्य व संविधानावर बोलणाऱ्या बहुजनांना नक्षली ठरवले जात आहे. शरद पवारसाहेब (Sharad Pawar) आदिवासी नाही, तर आदिवासी वंशज म्हणून आम्ही आदिवासी बांधव पवारसाहेबांना आपला सेनापती मानत आहे. आंतराष्ट्रीय परिषदेत यापुढे पवारसाहेब हे आपले नेतृत्व करत आदिवासींना त्यांचे हक्क मिळवून देतील, असे बिरसा मुंडा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम (Satish Pandam) यांनी सांगितले.

Trible leader Satish Pandam
शरद पवार म्हणाले, `मी सर्व मदत करतो, आधी तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे रहा`

आपल्याला वनवासी याचसाठी म्हणतात येथे कोणी आदिवासी नाही, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनीदेखील अन्यायाविरोधात ‘हर हर महादेव’चा नारा देत मोगलांना जेरीस आणले. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना मानणारा आदिवासी बांधव आहे. भाजप, आरएसएसचे बंदे आदिवासींचे हक्क दडपण्यासाठी वनवासी म्हणून आदिवासींना जाणूनबुजून नक्षली ठरवले जात आहे. मात्र यावर आदिवासी नेते बोलत नसल्याची खंत व्यक्त करताना सरदार पटेल यांचा पुतळा बसविण्यात आला, त्यासाठी स्थानिक आदिवासींना विस्थापित करण्यात आले, त्यांना न्याय नाही.

Trible leader Satish Pandam
आदिवासींवर खोटे गुन्हे दाखल करून नक्षली ठरविणे चुकीचे

ते पुढे म्हणाले, आज राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या लढाईत आदिवासींना न्याय देण्यासाठी इतरही समाजाने आम्हाला साथ द्यावी. असे म्हणत व्यासपीठावर जो जमीन सरकारी है, ओ जमीन हमारी है!, बच्चे बच्चे को सिखाना है, वनवासी नहीं हम आदिवासी है! असा नारा श्री. पेंदाम यांनी दिला.

शरद पवारांना मानवंदना

श्री. पेंदाम यांच्या आदेशानुसार श्री. पवार यांना आपला सेनापती मानत बिरसा मुंडा ब्रिगेडतर्फे मानवंदना देण्यात आली. विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ याच्यासह अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच आजी माजी आमदार, परिसरातील सरपंच, उपसरपंच आदिवासी बांधव उपस्थित होते.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com