गुलाबराव पाटील म्हणाले, `आम्ही देखील सरकार पडण्याची वाट पाहत आहोत`

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबिर संपल्यावर पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रीया
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama

जळगाव : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे )NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या विधानावर त्यांची चांगलीच खिल्लीउडवली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डीचे शिबिर संपले आहे. त्यामुळे आता राज्यातील शिंदे सरकार (Eknath Shinde Government) केव्हा कोसळते याची आम्ही सगळे वाट पहात आहोत. (Minister take a tweest on NCP leader Jayant Patil`s Statement)

Gulabrao Patil
सुषमा अंधारे जोमात अन् सत्ताधारी एकनाथ शिंदे गट कोमात!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार शिर्डी येथील अधिवेशनानंतर कोसळेल, असे भाकीत केले आहे. यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांना शनिवारी प्रतिक्रिया विचारली.

Gulabrao Patil
राष्ट्रवादीला झटका, नेत्यांसह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश!

ते म्हणाले, की भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेसने पहाटे कोंबडा आरविण्यापूर्वीच सत्तेत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. शहाजीबापू पाटील, तर आता बोलले; परंतु त्या अगोदरच राष्ट्रवादी भाजपसोबत गेली होती. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता, तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबतच गेली असती, असा दावाही त्यांनी केला.

जयंत पाटील यांनी शिबिर संपल्यानंतर सरकार कोसळण्याचा दावा केला आहे., मात्र आज शिबिर संपले आहे. त्यामुळे आपण सरकार पडण्याची वाट पाहत आहोत. आपले आमदार आपल्यासोबत कायम राहावे म्हणून त्यांना असे बोलावे लागते. आमचे सरकार पडणार नाही, ते भक्कम आहे. दोन वर्षाचा कार्यकाळ आमचे सरकार पूर्ण करेल, असा दावाही त्यांनी केला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in