
Nashik Maratha Andolan : जालना येथील घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. नाशिक शहरात काल विविध संघटना एकत्र आल्या. त्यांनी धरणे आंदोलन करीत राज्य शासनाचा निषेध केला. दिवसभर आंदोलनाचे पडसाद उमटत होते. आज (रविवारी) बंदचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांची झोप उडाली असून रात्रभर पोलिस संघटनांच्या नेत्यांवर लक्ष ठेऊन होते. (Police on alert in Nashik city due to Maratha organisation`s Bandh)
नाशिक (Nashik) शहरात आज मराठा (Maratha) संघटनांनी बंदचे आवाहन केले आहे. राज्य सरकारच्या (Maharashtra Government) निषेधार्थ हे आंदोलन होत असल्याने त्याबाबत पोलिस (Police) दक्ष आहेत.
जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. पोलिसांच्या लाठीहल्ल्याचा नाशिक जिल्ह्यातही ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. त्यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यातही पोलिस सतर्क झाले आहेत. संवेदनशील ठिकाणी जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान, सोशल मीडियातूनही घटनेचा निषेध होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चिथावणीखोर संदेश व्हायरल होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जात आहे.
जालना येथे मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या घटनेमुळे राज्यभर मराठा आंदोलकांकडून निषेध व्यक्त होतो आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही मराठा समाजातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. या घटनेमुळे शहर-जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर-जिल्हा पोलिस सतर्क झाले आहेत.
नाशिक शहर आयुक्तालय हद्दीतील मध्यवर्ती बसस्थानक, ठक्कर बझार बसस्थानक, महामार्ग बसस्थानक, नाशिक रोड बसस्थानक, निमाणी बसस्थानक, नाशिक रोड रेल्वेस्थानक याठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याशिवाय, जिल्हाधिकारी कार्यालयासह शासकीय कार्यालयांच्या ठिकाणीही पोलिस तैनात करण्यात आले. शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा सज्ज असून, गर्दीची ठिकाणे असलेल्या बाजारपेठा, मार्केट परिसरातही पोलिसांकडून सतर्कता बाळगली जात आहे. आठ सहाय्यक आयुक्त, ८० पोलिस निरीक्षक-सहाय्यक निरीक्षकांसह सुमारे ७५० पोलिस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे. याशिवाय, राखीव पोलिस दलाच्या तुकड्या, शीघ्र कृती दल, दंगाविरोधी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. गुन्हे शाखांच्या पथकांसह पोलिस ठाणेनिहाय पोलिसांकडून पेट्रोलिंग वाढविण्यात आलेली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.