Cooperative: सहकारी संस्थांच्या बांधावरच पाऊस पडणार होता का?

संस्थगित निवडणुकांना मुहूर्त कधी?, राज्यभर उमेदवार व मतदारांत संभ्रमावस्था
Rajendra Bhosale, NCP
Rajendra Bhosale, NCPSarkarnama

मालेगाव : पावसाचे (Monsoon) कारण देत शिंदे सरकारने (Shinde Government) सहकारी संस्थांच्या निवडणुका (Elections) संस्थगित केल्या. निवडणुकांची ही संभावित मुदत लवकरच संपणार आहे. शासनाने (State Government) जे कारण देत निवडणुका थांबवल्या त्याच काळात मात्र इतर निवडणुका सुरळीत पार पडल्या. सहकारी संस्थांच्या बांधावरच पाऊस पडणार होता का, हे गौडबंगाल (Secret) कळत नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांनी उपस्थित केला आहे. (Shinde Government deferred cooperative bank, Society election)

Rajendra Bhosale, NCP
Nashik News: नाशिकला डावलणारे जिल्ह्याचे पालकमंत्री कसे?

शासन स्तरावर याबाबत उदासीनता असल्याने उमेदवार व मतदार यांच्यात संभ्रम निर्माण होत आहे. तीन महिन्यानंतर जिल्ह्यांना ‘पालकत्व’ मिळाल्यावर आता तरी स्थगित निवडणुकांना मुहूर्त लागेल का, असा सवाल उपस्थित होत आहे.

Rajendra Bhosale, NCP
Raosaheb Danve: पाचोरा-बोदवड ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्प मार्गी लावणार

राज्यभरात सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू असताना अतिवृष्टीचे कारण देत निवडणूक स्थगिती देण्यात आली. एकीकडे प्रक्रिया सुरू असलेल्या संस्थांची निवडणूक पावसाचे कारण देत थांबवण्यात आली. त्याच काळात राज्यभरात अनेक शिक्षण संस्थांच्या निवडणुका मात्र घोषित होऊन गुलालही उधळला गेला. एकाच कार्यक्षेत्रात असा अनाकलनीय निर्णय घेऊन शासनाने नेमके कुणाचे हित साधले, हे सामान्य मतदारांना कळेनासे झाले आहे.

शिक्षक बँक, सहकारी पतसंस्था, व्यापारी बॅंका, लहान- मोठ्या पतसंस्था यांच्या निवडणुका ऐन भरात असताना संस्थगित करण्यात आल्या. या विरोधात अनेक पॅनलचे नेत्यांनी कोर्टात दाद मागितली. निवडणुका संस्थगित करणे संयुक्तिक नसल्याचा निर्वाळा खंडपीठात याचिकाकर्त्यांना मिळाला. मात्र, कार्यवाही अद्याप गुलदस्त्यात आहे. अगदी दोन दिवसात मतदान होणार अशाही स्थितीतील निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली. नेमक्या याच मुहूर्तावर शासनाने खोडा घातल्याने पॅनलचे नेते आणि उमेदवार यांचा उत्साह मावळला आहे. प्रतीक्षा करणेच सोडून दिल्याने उमेदवारच आता मतदारांच्या भेटीला ‘बायपास’ करत आहेत.

निर्माण होताहेत संवैधानिक प्रश्‍न

संस्थगित निवडणूक प्रक्रियेने अनेक नवे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. उमेदवारी अर्जावर वयाच्या वैधतेवर बोट ठेवत अनेकांचे अर्ज बाद ठरवले आता निवडणूक प्रक्रियाच अडीच महिन्यांनी वाढल्याने अगदी दिवसाच्या फरकाने अर्ज बाद करण्यात आले होते. स्थगिती मिळालेल्या संस्थांचा पंचवार्षिक कालावधी कोणता निश्‍चित होणार, स्थगित काळ आगामी पंचवार्षिक काळात गणला जाणार की वगळला जाणार, मग स्थगित काळात मुदत संपलेल्या संचालक मंडळाचे घेतलेले निर्णय योग्य की अयोग्य, याबाबत राज्यभर संभ्रमावस्था आहे. सहकारी अधिनियमाची जबाबदारी असलेले अधिकारी वर्गही समर्पक उत्तरे देत नसल्याने सहकारी संस्था वाऱ्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता जिल्ह्याला पालकमंत्री लाभल्याने निवडणुकांचा मार्ग खुला करावा, अशी मागणी होत आहे.

उमेदवारांना निवडणूक मैदानात उतरवून शासनाने अक्षरशः पोरखेळ केला आहे. एकीकडे ग्रामपंचायत निवडणूक सुरू आणि दुसरीकडे सहकारी संस्था स्थगित हा प्रकार महाराष्ट्र नव्याने अनुभवत आहे.

- साहेबराव कुटे, शिक्षक नेते, नाशिक

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com