विरोधक सात वर्षे झोपले होते का?

जिल्हा दूध संघ निवडणूकीत कामाच्या विश्‍वासावर ‘मविआ’ ला यश मिळणार
Dr. Satish Patil
Dr. Satish PatilSarkarnama

जळगाव : जिल्हा दूध संघात (Jalgaon Milk federation) गेली सात वर्षे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय संचालकांनी कार्य करून दूध उत्पादकांचा विश्‍वास संपादन केला आहे. त्याच विश्‍वासाच्या बळावर महाविकास आघाडीला (Mahavikas Front) या निवडणुकीत यश मिळणार आहे, असा विश्‍वास माजी आमदार डॉ. सतीश पाटील (Dr. Satish Patil) यांनी व्यक्त केला. (Dr. Satish Patil got faith in Jalgaon Milk sangh election)

Dr. Satish Patil
नाशिकला आक्रमक शिवसेनेची चक्क गांधीगिरी

गेले काही दिवस एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील जळगाव जिल्हा दूध संघाशी संबंधीत राजकारण तापले आहे. सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपव एकनाथ शिंदे गटाचो दोन्ही मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील चांगलेच सक्रीय झाले आहे. श्री. महाजन सतत खडसे यांच्यावर आरोप करीत आहेत, त्याचा माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला.

Dr. Satish Patil
ठाकरे गटाच्या प्रकाश वाजेंच्या वाढदिवसाला दादा भुसेंची साखरपेरणी चर्चेत

जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीबाबत ते म्हणाले, की दूध संघ डबघाईस गेला होता. त्याला उर्जितावस्था आणण्याचे काम गेल्या सात वर्षांत झाले आहे. संघात अत्याधुनिक मशीनरी आली आहे. दूध उत्पादकांचा विश्‍वास संपादन झाल्यामुळे आज लाखो लिटर्स दूध संकलीत होत आहे.

दूध संघात जे काम गेल्या सात वर्षांत झाले आहे, ते आज जनतेसमोर आहे. निवडणुकीच्या तोंडावर विरोधक आरोप करीत आहेत, ते त्यांना सिद्ध करावे लागणार आहे. गेली सात वर्षे आरोप करणारे विरोधक झोपले होते का? त्यामुळे जनता सर्व ओळखून आहे. त्यांनी जे आरोप केले आहेत, त्याची चौकशी होईलच. जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई होईल. मात्र, आज जनमाणसात गेल्या सात वर्षांतील दूध संघाच्या कार्यामुळे एक चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. त्याच बळावर आम्ही महाविकास आघाडीच्या पॅनलच्या माध्यमातून जनतेसमोर जाणार आहोत.

याशिवाय विरोधकांच्या द्वेषाच्या राजकारणाला आता जनता कंटाळली आहे. जनतेला आज विकास हवा आहे. जिल्हा दूध संघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही चांगले काम करून दूध संघावरचा शेतकरी व जनतेचा विश्‍वास कायम राखू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in