राज ठाकरेंना इशारा... तर वारकरी गुन्हे दाखल करतील!

हनुमान चालीसा पठणाचे राजकारण हा समाजाशी द्रोह असुन हे प्रकार तातडीने थांबवावेत.
राज ठाकरेंना इशारा... तर वारकरी गुन्हे दाखल करतील!
Raj Thakre &Prof. Amar ThombareSarkarnama

नाशिक : शहरात (Nashik) मुस्लिम (Muslim) बांधवांनी हनुमान मिरवणुकीवर फुले उधळली. पंढरपुरला (Pandharpur) वारकरी आल्याने मुस्लिमांनी ईद असली तरी मांसाहर करणार नाही,असे सांगितले. हा एकोपा राजकारणात आंधळे झालेल्यांना दिसत नाही का? त्यामुळे हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa) राजकारण बंद करावे, अन्यथा वारकरी समिती स्वतः याबाबत पोलिसांत गुन्हे दाखल करील असा इशारा, वारकरी समितीचे प्रा. अमर ठोंबरे (Prof. Amar Thombre) यांनी दिला आहे.

Raj Thakre &Prof. Amar Thombare
संजय राऊतांनी आम्हाला रामभक्ती शिकवू नये!

याबाबत ते म्हणाले, नाशिकला दर बारा वर्षातून कुंभमेळा भरतो मागच्या कुंभमेळ्यात मुस्लिम बांधवांनी हिंदू साधू महंताना थंड पाण्याच्या बिसलरी बाटल्यांचे वाटप केले होते, हे कुणाला दिसले नाही.

Raj Thakre &Prof. Amar Thombare
सूर्य- चंद्र, तारे राहतील तोवर नितीन गडकरींचे नाव लक्षात राहील!

पंढरपूरला आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने पंढरपूरच्या मुस्लिम बांधवांनी बोकड बळी दिला नाही आज वारकरी पंढरपुरात येणार असल्याने आम्ही अगोदरच बैठक घेऊन मांसाहारी ईद साजरी करणार नाही असे तेथील मुस्लिम बांधवांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात अनेक मुस्लीम तरुणांनी पुढाकार घेऊन प्रेतं उचलीत स्मशान भूमीत नेली .इथल्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नमाज अदा करताना मुस्लिम बांधवांनी भारत देश हमारा है, हम सभ एक है, असा नारा दिला आणि अगदी अलीकडेच हनुमान जयंतीच्या मिरवणूकित याच मुस्लिम बांधवांनी फुले उधळून हिंदू धर्माप्रति आपला आदर केला.

ही सारी उदाहरणे ताजी असताना केवळ मतांवर डोळा ठेऊन दोन धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक मशिदीवरील भोंगे प्रकरण निर्माण केले आहे.हातावर पोट असणारे इथले अनेक मुस्लिम आणि हिंदू कुटुंब आहेत, भविष्यात काही वाद उदभवले तर त्याचे बळी हेच लोक ठरतील जे रस्त्यावर उभे राहून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

हिंदू किंवा मुस्लिम हा वादच आता सामान्य माणसे करत नाहीत देशाचे संविधान समजून घेणारे आणि किमान आपल्या धर्माप्रमाणे आचरण करणारे लोक तितके धर्मभोळे नाहीत की ते रस्त्यावर येऊन दुसऱ्या धर्मातील आपल्याच देश बांधवांना मारतील, वारकरी सेवा समिती या सुरू असलेल्या भोंगे प्रकरणाचा निषेध करत आहे. जातीय सलोखा कायम ठेऊन आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करूनहे प्रकरण मिटवले पाहिजे जर भविष्यात तसे घडले नाही तर दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि याच तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध वारकरी सेवा समिती स्वतः दखल घेत रीतसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यास हयगय करणार नाही.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.