जाहीर होण्यापूर्वीच प्रभागरचनेचा आराखडा फुटल्याची चर्चा!

महापालिकेची प्रभागरचना आज जाहीर होणार आहे.
NMC Building
NMC BuildingSarkarnama

नाशिक : महापालिका (NMC) निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिला असताना प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा फुटल्याची चर्चा शहरभर पसरली आहे. या फुटलेल्या आराखड्यात (Ward Formation) याचा भाग येथून तुटला येथपासून ते प्रभागांचे क्रमांक काय आहे हेदेखील सांगितले जात असल्याने शहरभर अफवांचा बाजार गरम झाल्याचे पाहायला मिळाले. अर्थात प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आराखडा फुटला की फक्त चर्चा होती, हे मंगळवारी सकाळी अकरा वाजता स्पष्ट होईल.

NMC Building
कोरोना विरोधात भारताचा लढा अगतिकतेतून आश्वासकतेकडे

राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेचा कच्चा आराखडा जाहीर करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार सकाळी दहा वाजता महापालिकेच्या वेबसाइटवर, तसेच सहा विभागीय कार्यालयांमध्ये आराखड्याच्या प्रती लावल्या जाणार आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत प्रभागरचनेवर हरकती मागविल्या जाणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी हरकतींवर सुनावणी देतील. प्रभागरचना जाहीर होणार असल्याने अनेकांनी सोईचा प्रभाग व्हावा म्हणून देव पाण्यात बुडविले आहेत. त्यात गेल्या चार- पाच दिवसांपासून कच्च्या प्रभागरचनेचा आराखडा फुटल्याच्या चर्चेला शहरात उधाण आले. पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक एकपासून ते पाथर्डी भागापर्यंत शेवटच्या प्रभागांपर्यंत हद्दी कशा बदलल्या, यातून कोणाचे नुकसान झाले, प्रभागरचना एका खोलीत बसून करणारा राजकीय पदाधिकारी कोण येथपासून ते प्रभागांचे क्रमांकदेखील जाहीररीत्या सांगितले जात आहेत.

NMC Building
आधुनिक शेतीकडे वळलेल्या युवा पिढीला सलाम करावासा वाटतो

पंचवटी विभागात किती प्रभाग राहतील. ४३ प्रभाग तीन सदस्यांचे, तर एक प्रभाग चार सदस्यांचा राहील. चार सदस्यांचा प्रभाग नेमका नाशिक रोड भागात राहील की पंचवटी विभागात, यावर छातीठोकपणे चर्चा होती. नाशिक रोड भागात राजकीय नेते कसे एकमेकांविरुद्ध उभे राहून पडतील. कालांतराने विधानसभा निवडणुकीसाठी विशिष्ट नेत्यांचा मार्ग कसा मोकळा होईल, याबाबतच्या चर्चेने अफवांचा बाजार शहरात तेजीत आला होता.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com