'वळसे पाटलांनी कायद्याचा हिसका दाखवून भाजपच्या दोन-चार जणांना आत टाकावे'

राज्यात विरोधकांचा छळ सुरू आहे. त्यामुळे वळसे पाटील यांनी कायद्याच्या मार्गाने भाजपच्या दोन चार जणांना जेलमध्ये टाकावे, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी जळगावात बोलताना केले.
Dilip Walse Patil-Eknath khadse
Dilip Walse Patil-Eknath khadseSarkarmnama

जळगाव : देशात सद्या द्वेषाचे राजकारण सुरू आहे. केंद्र सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई करून त्याचा छळ केला जात आहे व त्यांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमचे काहीच नसताना कारवाई सुरू आहे, परंतु त्यांचे तर भरपूर आहे, त्यामुळे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी कणखर भूमिका घेऊन कायद्याच्या मार्गाने त्यांना इंगा दाखवावाच, असे आवाहन माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले. (Walse Patil should put two-four BJP members in jail through legal means : Eknath Khadse)

जळगाव जिल्ह्यात चांदसर येथे आमदार मु. ग. पवार यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून खडसे बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील आदी उपस्थित होते. माजी पालकमंत्री खडसे म्हणाले की, आमदार मु. ग. पवार यांचे शरद पवार यांच्यासोबत घट्ट नाते होते. तसेच, त्यांचे कार्यकर्त्यासोबतही नाते होते.

Dilip Walse Patil-Eknath khadse
ओबीसी आरक्षणासाठी पंढरपुरातून एल्गार संघर्ष यात्रा; मुंबईत १७ मे रोजी आंदोलन

राज्यातील परिस्थितीवर बोलताना खडसे यांनी स्पष्ट केले की, राज्यात सद्यस्थितीत द्वेषाचे राजकारण सुरू आहे. विरोधकांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी गिरीश महाजन यांना महागाईवर मोर्चा काढण्यास सांगितले. ते त्यांच्या अत्यंत जिव्हारी लागले आणि त्यांनी माझ्यावर टीका सुरू केली. मी त्यांना बोट धरून राजकारणात आणले, तेच माझ्यावर टीका करू लागले आहेत. तेच शरद पवार यांच्यावर बोलायला लागले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर व त्यांच्याशी संबंधित लोकांवर तब्बल शंभर छापे टाकून त्यांना छळले जात आहे. गृहमंत्री वळसे पाटील यांनी त्यांना कायद्याने हिसका दाखवून दोन-चार जणांना आत टाकले तर हे सर्व बंद होईल.

Dilip Walse Patil-Eknath khadse
मातोश्रीबाहेर येऊन दाखवा; शिवसैनिक काय आहोत, हे आम्ही दाखवतो : पेडणेकरांचे राणांना आव्हान

शरद पवार यांच्याबाबत खडसे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस म्हणत होते, मैदानात आता कोणीही पहिलवानच नाही, मी एकटाच पहिलवान आहे. परंतु शरद पवार यांनी असा काही डाव खेळला की एका रात्रीत या पहिलवानाला चीत करून टाकले. भाजपला वाटत होते, आपल्याला वगळून राज्यात सत्ता येऊच शकत नाही; परंतु शरद पवार यांनी भाजपला वगळून राज्यात सत्ता स्थापन करण्याची किमया करून दाखविली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com