महाजन-पाटलांचे आव्हान खडसे मोडीत काढणार? : जळगाव जिल्हा दूध संघासाठी पुन्हा लढाई

जळगाव जिल्हा दूध संघासाठी येत्या दहा डिसेंबर रोजी मतदान होणार आहे
Eknath Khadse-Gulabrao Patil-Girish Mahajan
Eknath Khadse-Gulabrao Patil-Girish MahajanSarkarnama

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्हा सहकारी दूध संघाच्या (Dudh Sangh) निवडणुकीवरील (Election) स्थगिती उठविली आहे. येत्या दहा डिसेंबर रोज दूध संघासाठी मतदान होत असून प्रचाराची रणधुमाळी पुन्हा सुरू झाली आहे. जिल्हा दूध संघावरील खडसेंचे (Eknath Khadse) वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि भाजपकडून हेाताना दिसत आहे. त्यांच्या जोडीला आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटीलही (Gulabrao Patil) आले आहेत. दुसरीकडे खडसे हे दूध संघावरील वर्चस्व राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची शक्यता आहे. (Voting for Jalgaon jillha dudh sangh on 10th December)

शिवसेना फुटीनंतर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. भाजपसोबत या गटाची युती झाली आणि पाटील यांना मंत्रीपदही मिळाले. भाजपकडून गिरीश महाजनही मंत्री झाले. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत आता दोघांची युती झाली आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दूध संघात सत्ता आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना (ठाकरे गट) यांच्या महाविकास आघाडीचे पॅनेल आहे. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीच्य पार्श्र्वभूमीवर होत असलेल्या या निवडणूकीत खऱ्या अर्थाने ‘राजकीय’ वर्चस्वाची ही लढाई होत आहे.

Eknath Khadse-Gulabrao Patil-Girish Mahajan
Beed : राष्ट्रवादीच्या माजी जिल्हाध्यक्षाची डॉक्टर लेक आता ग्रामपंचायत निवडणुकीत नशीब आजमावणार

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या अगोदरपासूनच राजकीय लढाई सुरू आहे. दूध संघात एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. राज्यात सत्तातंर झाल्यानंतर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांची मुख्य प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पदभार घेतला. मात्र, खडसे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने प्रशासक मंडळ अवैध ठरवित संचालक मंडळाकडेच कारभार दिला.

Eknath Khadse-Gulabrao Patil-Girish Mahajan
Hansraj Ahir : मागासवर्ग आयोगाची सूत्रे हाती घेताच अहिरांनी केलेले विधान भाजपला आणणार अडचणीत?

प्रशासकपदाचा कारभार हाताशी असताना मंगेश चव्हाण यांनी संघातील माहिती घेऊन संघात अखाद्य तूप व्यवहारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. खडसे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने हा आरोप फेटाळून लावला. ही चोरी झाली असून या प्रकरणी कार्यकारी संचालकाच्या माध्यमातून पोलिस स्टेशनला चोरीची फिर्याद दाखल करण्यासाठी अर्जही दाखल करण्यात आला. मात्र, ही फिर्याद घेण्यात आली नाही. त्यामुळे खडसे यांनी पोलिस ठाण्याबाहेर आंदोलनही केले. त्यानंतर भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी फिर्याद दाखल केली, त्यावर पोलिसांनी कारवाई करून कार्यकारी संचालकासह काही जणांना अटक केली आणि पोलिस तपास सुरू केला. दूध संघ निवडणुकीअगोदर ही पहिली राजकीय लढाई दूध संघात सुरू झाली.

Eknath Khadse-Gulabrao Patil-Girish Mahajan
Gram Panchayat Election : या कारणांमुळे चुरस वाढली; पुण्यात सरपंचपदासाठी १०५०, तर सदस्यासाठी ५१०७ अर्ज

पोलिस व न्यायालयीन लढाई सुरू असतानाच जिल्हा दूध संघाची निवडणूक लागली, त्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र ही निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यानंतर पुन्हा प्रक्रिया सुरू झाली; मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमुळे पुन्हा निवडणूक स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले. पण, ग्रामपंचायत निवडणूक आणि जिल्हा दूध संघ निवडणुकीमधील अंतर मोठे असल्यामुळे मतदानापासून मतदार वंचित राहत नसल्याचे सरकारच्या लक्षात आले, त्यामुळे या निवडणुकीवरील स्थगिती उठविण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा रणधुमाळी सुरू झाली आहे. संघात दुसरी राज्यातील सत्ताधारी गट व विरोधी गटाची प्रशासकीय डावपेचाची लढाई झाली.

Eknath Khadse-Gulabrao Patil-Girish Mahajan
Gram Panchayat Election : सोलापूर जिल्ह्यात सरपंचपदासाठी १०६८, तर सदस्यासाठी ५८७९ अर्ज दाखल

आता तिसरी राजकीय लढाई सुरू झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकारचे सहकार पॅनेल आहे, तर भाजप नेते राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व शिवसेना शिंदे गटाचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनेल आहे. दोन्ही गटांनी आपली राजकीय ताकद पणाला लावली आहे. महाजन यांच्या गटात दोन मंत्री विद्यमान आमदार, माजी आमदार आहे. तर खडसे यांच्या गटातही आमदार, माजी आमदार व माजी मंत्री आहेत.

राज्यात सत्तातंर झाले, त्यातच शिवसेना फुटली. जळगाव जिल्ह्यात तर शिवसेनेचे चार आणि पुरस्कृत एक असे पाच आमदार फुटले आहेत. या फुटलेल्या आमदारांनीही आता शिंदे-भाजप गटात आपली ताकद लावली आहे. जिल्हा दूध संघात ४४३ मतदार आहेत. मतदार कमी असले तरी संपूर्ण जिल्ह्यातून मतदान आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पालिका निवडणुकीची ही राजकीय रंगीत तालीम मानली जात आहे. तसेच शिवसेना फुटल्यानंतर ही निवडणूक होत आहे.

वास्तविक एवढ्या मतदारावर पक्षीय ताकद जोखली जात नसली तरी एक वातावरणाचा कल कळून येतो, त्यामुळे आपले अधिपत्य दाखविण्यासाठी आता महाविकास आघाडी व भाजप-शिंदे गट सज्ज आहे. या लढाईमुळे जिल्ह्यातील राजकीय कल दिसून येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com