Voting : कोकणात 91, नागपूरमध्ये 86, तर नाशिकमध्ये सर्वात कमी; मतदानाची टक्केवारी काय सांगते?

MLC Election : विधान परिषदेच्या एकूण पाच जागांसाठी आता 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार
MLC Election
MLC Election Sarkarnama

Graduate Constituency Election : विधान परिषदेच्या एकूण पाच जागांसाठी आज राज्यात मतदान पार पडलं. सकाळी 8 वाजता सुरु झालेली मतदानाची प्रक्रिया सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होती. यामध्ये अमरावती, कोकण, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, जिल्ह्यांत मतदान पार पडलं आहे.

मात्र, सर्वांचेच लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अवघे 49 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. विधान परिषदेच्या एकूण पाच जागांसाठी आता 2 फेब्रुवारी 2023 ला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता या पाच मतदार संघात कोण बाजी मारतं? हे 2 फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार आहे.

MLC Election
Bharat Jodo Yatra : 'भारत जोडो'च्या समारोपाकडे राष्ट्रवादी-शिवसेनेची पाठ; पटोले, चव्हणांचीही अनुपस्थिती

दरम्यान, विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये जवळपास सरासरी 86.23 टक्के मतदान झाले आहे. तसेच नाशिक विभागात 49.28 टक्के, अमरावती विभागात 49.67 टक्के, औरंगाबाद विभागात 86 टक्के, आणि कोकण विभागात 91.02 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी किती टक्के मतदान झालं?

- नाशिक पदवीधर निवडणुकीत 49.28 टक्के मतदान झालं आहे.

जिल्हा निहाय मतदानाची आकडेवारी

- अहमदनगर जिल्ह्यात 50.40 टक्के मतदान झाले

- धुळे जिल्ह्यात 50.50 टक्के मतदान झाले

- जळगाव जिल्ह्यात जिल्ह्यात 51.44 टक्के मतदान झाले

- नंदूरबार जिल्ह्यात 49.61 टक्के मतदान झाले

MLC Election
Amol Kolhe News : आघाडीने बहिष्कार टाकलेल्या शिंदेंच्या बैठकीला कोल्हे एकटेच हजर; राजकीय चर्चा जोरात...

अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीत किती टक्के मतदान झालं?

- अमरावती विभागात 49.67 टक्के मतदान झालं

जिल्हा निहाय मतदानाची आकडेवारी

अमरावती - 43.37 टक्के

अकोला - 46.91 टक्के

बुलढाणा - 53.04 टक्के

वाशिम - 54.80 टक्के

यवतमाळ - 58.87 टक्के

MLC Election
Shivsena Symbol News : शिंदेंनी निवडणूक आयोगात वेळेवर टाकला डाव; ठाकरेंची कोंडी? : लेखी युक्तीवादातील महत्त्वाचा मुद्दा समोर

नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये किती टक्के मतदान झालं?

- नागपूर विभागात 86.23 टक्के मतदान झालं आहे.

जिल्हा निहाय मतदानाची आकडेवारी

नागपूर : 81.43 टक्के

वर्धा : 86.82 टक्के

चंद्रपूर : 91.89 टक्के

भंडारा : 89.15 टक्के

गोंदिया : 87.58 टक्के

गडचिरोली : 91.53 टक्के

औरंगाबाद आणि कोकण विभागात किती टक्के मतदान झालं?

- औरंगाबाद विभागात 86 टक्के झालं?

- कोकण विभागात 91.02 टक्के मतदान झाले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com