
नांदगाव : ‘ज्या मतदारसंघात (Constituency) बंजारा समाजाचा (Banjara Community) सन्मान तेथेच मतदान’ हे सूत्र हाती घेऊनच आपण पुढे जायचे असून, हाच मंत्र श्री संत सेवालाल महाराज (Sent Sevalal maharaj) यांच्या अनुयायांनी लक्षात ठेवावा, असे आवाहन पोहरादेवी येथील गौर बंजारा धर्मपीठाचे प्रमुख महंत व सेवालाल महाराज यांचे वंशज महंत जितेंद्र महाराज (Jitendra Maharaj) यांनी केले. (Mahant Jitendra Maharaj appeal for banjara community)
आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्या पुढाकारातून तालुक्यातील विविध ठिकाणच्या तांड्यावर बंजारा समाजाचे दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या संगमरवरी मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने बाजार समिती आवारात सामूहिक प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला.
त्यावेळी महंत जितेंद्र महाराज बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठनेते बापूसाहेब कवडे होते. विश्वस्त समितीचे अध्यक्ष महंत कबीरदास महाराज, राजगढच्या श्री संत जयराम महाराज संस्थानचे महंत रायसिंगबापू महाराज या बंजारा समाजातील धर्मगुरूंची प्रमुख उपस्थिती होती.
जितेंद्र महाराज यांनी बंजारा समाजाचा असा सन्मान यापूर्वी कुणीही, कधीही, कुठेही केलेला नव्हता, अशा शब्दात आमदार कांदे यांच्या धार्मिक कार्याचा विशेष गौरव केला.
आमदार कांदे म्हणाले, ऊसतोडीसाठी नांदगाव तालुक्यातून कारखान्यावर जाणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी साखर शाळा सुरु करण्यासोबतच स्पर्धा परीक्षेसाठी वाचनालये सुरु करण्यात येतील.
व्यासपीठावर अंजूमताई कांदे, मनमाडचे माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, बबलू पाटील, माजी सभापती विलासराव आहेर, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, फरहान खान, सुनील गायकवाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समाधान पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळकाका कलंत्री, प्रमोद भाबड, किरण देवरे, सुनील जाधव, आनंद कासलीवाल, राजेंद्र पवार, डॉ. प्रभाकर पवार, सागर हिरे, राजाभाऊ जगताप, राजाभाऊ भाबड, लक्ष्मण राठोड आदी उपस्थित होते. राजाभाऊ देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
तांडा विकासासाठी कटिबद्ध
ऊसतोडीसाठी गेलेले कामगार आपल्या तांड्यावर परत येईपर्यंत तालुक्यातील ३६ तांड्यांवर प्रत्येकी वीस लाख रुपये खर्चाच्या बहुउद्देशीय सामाजिक सभागृहाचे काम पूर्ण झालेले असेल. या सभागृहात श्री संत सेवालाल महाराज यांच्या संगमरवरी मूर्ती स्थापित झालेल्या दिसतील, अशी माहिती देताना आमदार कांदे यांनी विधानसभा निवडणुकीत तांड्यातांड्यावर अन्य स्पर्धक उमेदवारांपेक्षा आपल्याला मताधिक्य मोठे होते, याची जाणीव ठेवून आपण भविष्यातही तांडा विकासासाठी निधीची कमतरता भासू देणारा नाही, अशी ग्वाही दिली.
---
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.