Shirdi : शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; 'ही' सुविधा केली बंद, आमदार-खासदारांना दणका

Shirdi VIP Darshan : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी पासची सुविधा आहे, मात्र...
Shirdi VIP Darshan
Shirdi VIP Darshan Sarkarnama

Shirdi VIP Darshan : शिर्डीत आता 'व्हीआयपी दर्शन' बंद होणार आहे. त्यामुळे साईबाबांचे व्हीआयपी दर्शन घडवून देणाऱ्या एजंटपासून आणि बोगस पिएंना चाप बसणार आहे. आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार आणि विश्वस्तांचे पाहुणे म्हणून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी व्हीआयपी पास मिळवत दर्शनची सुविधा आहे. मात्र, आता ही सुविधा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आमदार, खासदारांच्या बोगस पिएंना चाप बसणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिर्डीत व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली गोरखधंदा केला जात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे देवस्थानाने कठोर पावले उचलत आता आमदार, खासदारांचे बोगस पीए आणि एजंट यांना साईमंदिर परीसरात 'नो एन्ट्री' करण्यात आली आहे.

Shirdi VIP Darshan
Supriya Sule News : खोटे कारण देत राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश...सुप्रिया सुळेंना फसवणारा 'तो' नेता कोण?

शिर्डीत साई समाधी मंदिरात व्हीआयपी पास मिळवून दर्शनची सुविधा आहे. पण या सुविधेचा गैरवापर होऊन अनेक लोकप्रतिनिधींचे कथित पीए याचा लाभ घेऊ लागले होते. या व्हीआयपी पास मिळवून देत दर्शनची सुविधा उपलब्ध करून देत या व्हीआयपी पासचा एक प्रकारे धंदा केला जाऊ लागला होता. भक्तांकडून पैसे घेऊन दर्शनासाठी व्हीआयपी पास देण्यात येत असल्याचे देवस्थानच्या लक्षात आले होते.

Shirdi VIP Darshan
Pune BJP : फडणवीसांनी पूजा महेश लांडगेंना कोणती गुरुकिल्ली दिली?

त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यासाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने नियमात बदल करत लोकप्रतिनिधींच्या अधिकृत पीएकडून आणि जनसंपर्क कार्यालयातून आलेल्या पासधारकांनाच आता प्रवेश मिळणार आहे.

तसेच आपला नेमकी अधिकृत पीए कोण? हे आधीच साईसंस्थांना पत्र पाठववून कळवावं लागणार आहे. हा निर्णय शिर्डी संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in