Chhagan Bhujbal: विनायक मेटे यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मेटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : शिवसंग्रमचे (Shivsangram leader) नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं आज पहाटे अपघाती निधन झाल्याची दुःखद बातमी ऐकून तीव्र दुःख झाले असून विनायक मेटे यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे, अशा शोकभावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केल्या आहे. (Chhagan Bhujbal pay condolence to Vinayak Mete)

Chhagan Bhujbal
Shinde Government: लाल दिव्याची हवा डोक्यात गेल्यास विकासाचा चक्काचूर होतो!

छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, अतिशय सामान्य गरीब कुटुंबातून पुढे आलेले विनायक मेटे हे लढवय्या नेते होते.कष्ट करून सामाजिक चळवळीतून ते पुढे आले.शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून विनायक मेटे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी सातत्याने संघर्ष केला. सामाजिक आणि समाजाभिमुख कामांसाठी ते नेहमीच पुढे असायचे त्यासाठी त्यांनी अनेक चळवळी उभ्या करून अखेर पर्यंत संघर्ष केला.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal: नाशिकसाठी काही केले, की ते पळवण्याचा चंगच!

एक संघर्ष करणारा चळवळीतील नेता कायमचा पडद्याआड गेला आहे. मी व माझे कुटुंबीय मेटे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com