भगूरच्या शिवसेनेचा बालेकिल्ल्यात करंजकरांचाच `विजय`

भगूर शेतकी सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल विजयी
Bhagur society winner candidates
Bhagur society winner candidatesSarkarnama

भगूर : भगूर (Bhagur) शेतकी सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेना (Shivsena) जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांच्या नेतृत्वाखालील श्री शेतकरी विकास पॅनलने सर्वच जागा जिंकत प्रतिस्पर्धी बळिराजा विकास पॅनलचा धुव्वा करत दणदणीत विजय मिळविला. निकाल घोषित होताच शिवसैनिक व पॅनलच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करून पेढे वाटत विजयाचा जल्लोष साजरा केला.

Bhagur society winner candidates
कोर्ट `विक्रांत` सारख्या प्रश्नावर दिलासा देत असेल तर जनतेचा उद्रेक होईल!

भगूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत शिवसेनेच्या विरोधात त्यांचे सर्वच विरोधक संघटीत झाल्याचे चित्र होते. येथे नगरपालिकेसह सर्व सत्तास्थांनावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचे वर्चस्व आहे. महाविकास आघाडीने ज्या बारा सदस्यांची विधान परिषदेसाठी शिफारस केली आहे, त्यात श्री. करंजकर यांचा समावेष आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केले. त्यात त्यांनी सर्व जागांवर विजय मिळवत विरोधकांना धुळ चारली.

Bhagur society winner candidates
चाचडगाव, वाचनसंस्कृती आणि वाचनालय...

या निवडणुकीत एम. पी. कासार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. श्री शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : उत्तम आहेर २२२, भूषण करंजकर २४२, विजय करंजकर २४५, चंद्रकांत कासार २२८, भाऊसाहेब गायकवाड २४३, राजेंद्र डोंगरे २०४, काकासाहेब देशमुख २४०, निवृत्ती बोराडे २०४, शंकर करंजकर २४७, सिंधूताई कदम २४५, इंदुमती लकरिया २१६ तर यापूर्वीच बाळासाहेब साळवे व पांडुरंग शिरसाट बिनविरोध विजयी झाले आहे.

या वेळी नगराध्यक्ष अनिता करंजकर, रंगनाथ करंजकर, शिवसेना माजी शहरप्रमुख अंबादास कस्तुरे, उत्तमराव कासार, निवृत्ती करंजकर, विठ्ठल करंजकर, उपनगराध्यक्ष सुदेश वालझाडे, नगरसेवक संजय शिंदे, संग्राम करंजकर, परशराम कुटे, दिनेश खाडे, सुनील करंजकर, सुरेश करंजकर, सुरेश पंजवानी, रोहिदास करंजकर, किशोर करंजकर, प्रमोद घुमरे, प्रकाश करंजकर, राजेंद्र जाधव, प्रवीण लकरिया, बाळासाहेब गायकवाड, दत्तू करंजकर, रोहित कासार, बाळासाहेब कासार, राजेंद्र करंजकर, पांडुरंग आंबेकर, युवराज कासार, श्याम ढगे, संदीप कदम, बाळासाहेब बोराडे, प्रकाश सुराणा, श्याम गायकवाड, उत्तम करंजकर, विवेक शेखर जाधव, सिद्धेश गायकवाड आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com