एकनाथ खडसेंच्या विजयासाठी दुग्धाभिषेक ; मंत्री होऊन जळगावला या !

देवेंद्र फडणवीस खडसेंवर कुठला 'गेम' करणार, याबाबत सध्या चर्चा सुरु आहे.
एकनाथ खडसेंच्या विजयासाठी दुग्धाभिषेक ; मंत्री होऊन जळगावला या !
Vidhan parishad election 2022 News, Eknath Khadse News updates in Marathi, MLC Election 2022sarkarnama

जळगाव : राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा विधान परिषदेच्या (Vidhan parishad election 2022) निवडणुकीत विजय व्हावा, खडसेंना मंत्रीपद मिळावे, यासाठी जळगाव येथे खडसे समर्थकांनी राष्ट्रवादी युवा किसान मोर्चातर्फे (ncp) महादेवाला दुग्धाभिषेक करीत साकडे घातले आहे. (Eknath Khadse news update)

जळगाव येथील कालिंकामाता मंदिरातील महादेव मंदिरात हा अभिषेक करण्यात आला. या बाबतीत राष्ट्रवादी युवा किसान मोर्चाचे सुरज नारखेडे म्हणाले, "एकनाथ खडसे यांच्यावर असलेली पिडा टळून निवडणुकीत खडसेंचा विजय व्हावा व मंत्री होऊन त्यांचे जळगावात पदार्पण व्हावे, अशी प्रार्थना करून देवाकडे साकडे घातले आहे. देव निश्चित यश देईल," यावेळी खडसे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकनाथ खडसेंना पराभूत करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस खडसेंवर कुठला 'गेम' करणार, याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. विधानपरिषद निवडणुकीत खडसेंना भाजनं टार्गेट केलं आहे. (Vidhan parishad election 2022 News)

Vidhan parishad election 2022 News, Eknath Khadse News updates in Marathi, MLC Election 2022
विधानपरिषद निवडणूक : पक्षादेश पाळणं आमच्या रक्तात : मुक्ता टिळक

राज्यसभेतील भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलेल्या एका सूचक ट्विटची राज्याच्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. तसेच, 'तो' मिशीवाला मावळा कोण? अशीही विचारणा होऊ लागली आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा.'

महाविकासआघाडीने दिलेल्या एकूण उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवारांची मिशी आहे. तर काही बिनमिशीचे. त्यामुळे हा मिशिवाला उमेदवार नेमका आहे तरी कोण याबाबत उत्सुकता आहे. भाऊ आणि भाई यांचा उल्लेख हा एकनाथ खडसे आणि भाई जगताप यांच्याकडे असल्याचे स्पष्टच जाणवते. मात्र, तो मिशीवाला मावळा कोण याची मात्र जोरदार चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in