गटबाजीने पोळलेले गुरमितसिंग बग्गा सांभाळणार शहर काँग्रेसची सुत्रे!

अपक्ष नगरसेवक गुरमितसिंग बग्गा यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला.
Gurmeetsingh sbmits his resignation to commissioner Kailas Jadhav
Gurmeetsingh sbmits his resignation to commissioner Kailas JadhavSarkarnama

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी महापालिकेचे अपक्ष नगरसेवक व माजी उपमहापौर गुरमित बग्गा यांनी (Ex Dy Mayor Gurmeetsingh Bagga) आयुक्त कैलास जाधव (Commissionar Kailas Jadhav) यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. नियमानुसार अपक्ष निवडून आलेल्या व्यक्तींनी राजकीय पक्षात प्रवेश केल्यास त्यांना राजीनामा द्यावा लागतो. त्यानुसार बग्गा यांनी राजीनामा दिला असून, काँग्रेस (he May joine Congress) शहराध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव चर्चेत आहे.

Gurmeetsingh sbmits his resignation to commissioner Kailas Jadhav
`स्वतः रुपाली चाकणकरांनीच केली नाशिकच्या कंट्रोल रूमला तक्रार`

श्री बग्गा गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षात कार्यरत होते. पक्षाने स्थानिक गटबाजीमुळे एकदा त्यांची उमेदवारी टाळली. तर एकदा त्यांनी पक्षाची नाजुक स्थिती पाहून मिळालेली उमेदवारी अव्हेरली. काँग्रेसच्या गटबाजीचा जवळून अनुभव, अभ्यास व त्यात पोळलेल्या बग्गा यांच्याकडे शहर काँग्रेसची सूत्रे जात आहेत. त्यामुळे त्यांच्याशी पंगा घेणारे सावध तर अध्यक्ष मिळणार म्हणून अन्य काँग्रेसजन खुश अशी सध्याची स्थिती आहे.

Gurmeetsingh sbmits his resignation to commissioner Kailas Jadhav
महापालिकेत भाजप १०० जागा मिळवेल, शिवसेनेने दिवास्वप्न पाहू नये!

महापालिकेची स्थापना झाल्यानंतर निवडणुका सुरू झाल्यापासून श्री. बग्गा यांनी महापालिकेचे कामकाज जवळून पाहिले आहे. अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात आहे. सुरवातीपासून ते काँग्रेसमध्ये होते. परंतु, सन २०१२ मध्ये काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. सन २०१७ च्या निवडणुकीतही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजयी झाले होते. सन २०१२ च्या निवडणुकीत मनसेची सत्ता होती. त्यावेळी अपक्ष तसेच राष्ट्रवादीच्या मदतीने मनसेची दुसऱ्या टर्ममध्ये सत्ता आली होती. त्यावेळी बग्गा यांना उपमहापौरपद मिळाले होते. आता सन २०२२ मध्ये महापालिकेच्या निवडणुका होत आहे. त्यापूर्वी काँग्रेसमध्ये त्यांनी परतण्याचा निर्णय घेतला आहे. अपक्ष निवडून आल्याने पक्षात प्रवेश करायचा ठरल्यास त्यापूर्वी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा लागतो, असा नियम आहे. त्यानुसार बुधवारी (ता. २७) त्यांनी आयुक्त जाधव यांच्याकडे राजीनामा सादर केला. आयुक्तांनी राजीनामा तत्काळ मंजूर केला.

चमत्कार दिसेल का?

बग्गा हे शहराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी चर्चेनंतर बग्गा यांनी राजीनामा दिला. बग्गा यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे. त्याचबरोबर अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद व विमल पाटील हे दोघेही काँग्रेसच्या वाटेवर आहे. नाना पटोले यांच्या दौऱ्यात सय्यद यांनी त्यांची भेट घेतली होती. शिवसेनेने भाजपचे अठरा नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला असताना काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे नगरसेवक काँग्रेसमध्ये परतू लागल्याने महापालिका निवडणुकीत बग्गा यांच्या नेतृत्वाखाली वेगळा चमत्कार दिसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

...

काँग्रेसकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला. परंतु, मतदारांना दिलेला विकासाचा शब्द पाळण्यासाठी थांबलो होतो. आता जबाबदारी पूर्ण झाल्याने राजीनामा दिला. येत्या दोन दिवसात काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहे.

- गुरमित बग्गा, माजी उपमहापौर.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com