‘वंचित’चे कार्यकर्ते महापालिका निवडणुकांसाठी सज्ज!

वंचित बहुजन संघटनेच्या महानगर कार्यालयासह सात शाखांचे उद्‌घाटन
Rekha Thakur, Vanchit Bahujan Front
Rekha Thakur, Vanchit Bahujan FrontSarkarnama

सिडको : वंचित बहुजन आघाडीच्या धोरण व नेत्यांमुळे राजकीय वातावारण पक्षाला अनुकुल आहे. आगामी काळात पक्षाकडे मोठ्या प्रमाणात मतदार आकर्षित होत आहेत. त्यामुळे नेते, कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज रहावे, असे प्रतिपादन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर (Rekha Thakur) यांनी केले.

Rekha Thakur, Vanchit Bahujan Front
काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या प्रदेश अध्यक्षपदी विशाल मुत्तेमवार

वंचित बहुजन आघाडीच्या चुंचाळे येथील कार्यालयाचे, तसेच पक्षाच्या महानगरांतील सात नवीन शाखांचे उद्‌घाटन प्रदेशाध्यक्षा ठाकूर आणि उपाध्यक्ष गोविंद दळवी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

Rekha Thakur, Vanchit Bahujan Front
आगामी महापालिका निवडणुक भाजप विकासाच्या मुद्दयावरच लढणार!

यावेळी त्या म्हणाल्या, अॅड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या समर्थ नेतृत्वामुळे वंचित बहुजन आघाडीकडे मोठ्या प्रमाणात लोक आकर्षित होत आहे. त्याचा लाभ उचलून नाशिक महानगर आणि जिल्ह्यात आघाडीचे सर्वदूर जाळे विणण्यात आले. ही बाब स्तुत्य असून आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जास्तीत- जास्त जागा काबीज करण्यासाठी योग्य ती पावले उचला, जनसामान्यांची कामे करा, त्यांच्या सुख- दुःखात सामील व्हा, असे रेखा ठाकूर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.

गोविंद दळवी यांनीही पक्षाच्या यशाचा उंचावत असलेला आलेख सादर करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आव्हान पेलण्यास कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. असे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची योग्य रणनीती आखण्यात आली. आघाडीला जास्तीत- जास्त जागा मिळवून देण्यासाठी संघटनेतील कार्यकर्ते तत्पर आहेत. त्यामुळे पक्षाला निश्चित यश मिळेल.

शहरात आघाडीची ताकद दिवसेंदिवस वाढत असून, सर्व १३३ जागा स्वबळावर लढविण्याची आम्ही तयारी केली आहे. श्रेष्ठी आदेश देतील त्या पक्षाशी युती करण्याची आमची तयारी असल्याचे महानगर प्रमुख शिंदे यांनी सांगितले. यावेळी डॉ. चित्रा कुऱ्हे, वामनराव गायकवाड, जिल्हाप्रमुख पवन पवार आदी उपस्थित होते.

,,,

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com