राजमुद्रा लाऊन वाहने दामटणे आमदारांना पडणार महाग!

आमदारांनी वाहनांवर राजमुद्रा लावणे नियमबाह्य, आमदार पाटील यांनी राजमुद्रा काढली
Ashoka logo on MLA Cars
Ashoka logo on MLA CarsSarkarnama

अमळनेर : आमदारांनी राजमुद्रेचा (Ashoka) वापर करू नये, त्यांना राजमुद्रा वापरण्याचा घटनात्मक अधिकार नाही, असा निर्णय शासनाने (Government) घेतला असून, त्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षकांना सूचना दिलेल्या असल्याने त्यानुसार आमदार अनिल पाटील (Anil Patil) यांनी आपल्या वाहनांवरील राजमुद्रा चिन्ह असलेला लोगो (स्टिकर) काढून टाकला आहे.

Ashoka logo on MLA Cars
आधुनिक शेतीकडे वळलेल्या युवा पिढीला सलाम करावासा वाटतो

वाहनांवर राजमुद्रा चिन्ह वापरण्याचे अधिकार राष्ट्रपती, राज्यपाल यांनाच आहेत. काही पोलिस अधिकारी, राजकीय नेते शुभेच्छा कार्ड तसेच वाहनांवरदेखील तीन सिंह असलेल्या राजमुद्रेचा वापर करीत असतात. सर्वच आमदारांच्या वाहनांवर त्याचा वापर झालेला दिसतो. मात्र याबाबत आता शासनाने परिपत्रक काढले आहे.

Ashoka logo on MLA Cars
आदिवासी तालुक्याच्या प्रगतीसाठी राज्यपालांनी लक्ष घालावे

नव्या परिपत्रकानुसार आमदारांना हे चिन्ह वापरण्यास कुठल्याही सूचना नाहीत. मात्र आजही आजी-माजी आमदारांच्या, शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर हे चिन्ह दिसून येते. शासनाने घेतलेल्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना देखील पत्र देण्यात आले आहे.

या आदेशात म्हटले आहे की, प्रत्येक आमदाराला तशा सूचना देण्यात आल्या आहेत. अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी नियमांची अंमलबजावणी तातडीने केली असून, त्यांनी त्यांच्या वाहनांवरील राजमुद्रेचा लोगो काढून आता त्या जागी विधानमंडळाचे चित्र असलेला लोगो लावला आहे. याबाबत अनिल पाटील यांनी सांगितले, की जे आमदार राजमुद्रा चिन्ह वापरतील त्यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत, अशी भूमिका आता शासनाने घेतली असल्याने प्रत्येकाने ते बदलवून घेतले पाहिजे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com