गुरमित बग्गांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; अध्यक्षपदाच्या मार्गात मात्र गटबाजीची काटेरी फुले!

दोन दिवसापूर्वी अपक्ष नगरसेवक गुरमित सिंग बग्गा यांनी राजीनामा दिला होता.
Gurmeet Bagga joins congress in presemce of Nana Patole
Gurmeet Bagga joins congress in presemce of Nana PatoleSarkarnama

नाशिक : दोन दिवसापूर्वी अपक्ष नगरसेवकपदाचा राजीनामा दिलेले व पूर्वाश्रमीचे काँग्रेस नगरसेवक गुरमित सिंग (Gurmeetsingh Bagga) यांनी गुरुवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue minister Balasaheb Thorat) उपस्थित होते. मात्र प्रवेश करताच श्री. बग्गा यांनी यापूर्वी ज्यांच्यावर कुरघोडीचे राजकारण केले, त्यांनी त्यांच्या शहर अध्यक्षपदाच्या मार्गात गटबाजीची काटेरी फुले अंथरण्यास सुरवात केल्याचे चित्र आहे.

Gurmeet Bagga joins congress in presemce of Nana Patole
शरद पवारांविषयी अपशब्द बोलणारे भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले पळाले!

गुरमित बग्गा यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे बुधवारी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. नियमानुसार अपक्ष म्हणून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश करताना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्यानुसार त्यांनी आयुक्तांकडे राजीनामा सादर केला होता. आयुक्तांनी राजीनामा तत्काळ मंजूर केला. त्यानुसार बग्गा यांनी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयांमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. या वेळी महसूलमंत्री थोरात यांच्यासह काँग्रेस नेते मोहन जोशी, माजीमंत्री शिवाजीराव मोघे माजी आमदार जयप्रकाश छाजेड आदी उपस्थित होते.

Gurmeet Bagga joins congress in presemce of Nana Patole
जिल्हा न्यायालयातील सर्व वकील घाबरतात तो अब्दुल लतीफ आहे तरी कोण?

शहराध्यक्षपदाची गळ्यात पडणार

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस शहराध्यक्ष बदलला जाणार आहे. त्यासाठी गुरमित बग्गा यांचे नाव आघाडीवर असून त्याच बोलीवर त्यांना पक्षात घेण्यात आल्याचे समजते. पुढील आठवड्यात शहराध्यक्षपदासाठी बग्गा यांचे नाव जाहीर करण्यात येईल. महापालिकेत अभ्यासू नेतृत्व म्हणून बग्गा यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे काँग्रेस पक्षाला निश्चितच त्याचा लाभ होईल, असा दावा प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी बग्गा यांना प्रवेश देताना केला.

दरम्यान यासंदर्भात काही वरिष्ठ नेत्यांनी श्री बग्गा यांनी पक्षात प्रवेश केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी प्रीप्लॅन होत्या. त्यांनी पक्षात प्रवेश केला म्हणजे ते लगेच शहराध्यक्ष होतील असा दावा करणे योग्य नाही. थोड थांबा, प्रदेशाध्यक्ष सर्वांचा विचार करून निर्णय घेतील, अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com