Late R R Patil & IPS P. K. Jain

Late R R Patil & IPS P. K. Jain

Sarkarnama

मालेगाव स्फोटात गौप्यस्फोट; माजी IPS अधिकाऱ्याचे आर आर पाटलांकडे बोट!

निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने दूरचित्रवाणीवरील चर्चेत खळबळजनक आरोप केला.

नाशिक : मालेगावला २००६ आणि २००८ मध्ये स्फोट झाले. यातील पहिल्या स्फोटात पाकीस्तानी दहशतवादी (Terrorism) व काही स्थानिक लोकांचा सहभाग होता. मात्र नंतरच्या स्फोटानंतर त्यात राजकीय (UPA Politics) हस्तक्षेप झाला. याबाबत तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (R. R. Patil) यांच्यावर त्यांनी ताशेरे ओढत, या प्रकरणाला भगवा दहशतवाद चिकटवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप निवृत्त पोलिस अधिकारी पी. के. जैन (Maharashtra Police) यांनी केला आहे.

<div class="paragraphs"><p>Late R R Patil &amp; IPS P. K. Jain</p></div>
शिवसेना म्हणते, कंत्राटदाराचे २८ कोटी रुपये देऊ नका?

श्री जैन यांनी पोलिस सेवेतून मुदतपूर्व निवृत्ती घेतली होती. त्यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा वावड्या होत्या. अंतिमतः त्यांनी `एनडीए`चा (NDA) घटक असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. एका दुरचित्रवाणी वाहिनीवरील भगवा आतंकवाद या विषयावरील चर्चेत श्री. जैन यांनी हा खळबळजनक आरोप केला. यामध्ये य़ुपीए सरकारने एका राजकीय पक्ष व त्याच्या विचारसरणीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला असेही सांगितले.

<div class="paragraphs"><p>Late R R Patil &amp; IPS P. K. Jain</p></div>
लेखापरिक्षकांना वादग्रस्त `वॉटरग्रेस`च्या बिलांची नस्तीच दिली नाही?

ते म्हणाले, मालेगावला स्फोट झाले तेव्हा मी नाशिक परिक्षेत्राचा विशेष पोलिस महानिरीक्षक होतो. स्फोटांनतर घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांत मी पहिला होता. त्यामुळे मला २००६ च्या स्फोटांची अतिशय चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यात जे आरोपी पकडण्यात आले होते.

या स्फोटाची खुप कसुन चौकशी केली होती. वारंवार खातरजमा करण्यात आली. त्यानंतर त्या आरोपींना पकडण्यात आले होते. मात्र त्यानंतर २००८ मध्ये स्फोट झाल्यानंतर २००६ च्या स्फोटाच्या घनेतील संपुर्ण पार्श्वभूमी बदलण्यात आली. जे स्थानिक लोक तसेच पाकीस्तानातून आलेले आरोपी होते त्यांच्याबाबत वेगळा दृष्टीकोण बाळगण्यात आला. त्यांना मदत करणाऱ्या स्थानिक आरोपींना त्यातून वगळण्यात आले. त्यात २००८ च्या आरोपींना समाविष्ट करण्यात आले. संपुर्ण खटल्याचा सत्यानाश करण्यात आला. हे सर्व राजकीय हस्तक्षेपामुळे झाले.

ते पुढे म्हणाले, मला आताही आठवते की, तेव्हाचे आमचे गृहमंत्री (कै) आर. आर. पाटील होते. दुर्दैवाने आज ते नाहीत. त्यांनी माझ्या पत्रकार परिषदेआधी वारंवार हे सांगितले की पत्रकार परिषद पुढे ढकला. यामुळे तेथील स्थानिक वातावरण बिघडेल. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यात होत्या. जे आरोपी होते त्यांना पकडू नये यासाठी राजकीय दबाव होता. ती अटक काही काळ पुढे ढकलावी. माझ्या मनात याबाबत काहीही संशय नाही की २००६ मध्ये जे लोक पकडले गेले होते, तेच खरे आरोपी होते. त्यांच्यावर योग्य प्रकारे खटला चालवला गेला असता तर नक्कीच त्यांना शिक्षा झाली असती. सबंध प्रकरणात राजकीय आरोपातून हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला की, हे भगवा आतंकवाद आहे. त्यातून हे स्फोट झाले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com