
मनमाड (नाशिक) : नाशिकमधून एक महत्त्वाची अपटेड समोर आली आहे. अवकाळी पाऊस आणि शेतपिकांना, कांद्याला भाव मिळत नसल्याने नाशिकमधल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाशिकमधील सटाणा तालुक्यातील मुंदवाड गावच्या शेतकरी क्रांती मोर्चा व राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी (Farmer) चक्क पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदीचे फलक लावले आहे. (Until then, no entry to the village for the minister...; Aggressive farmers)
शेतकऱ्यांनी (Farmers News) शेतात कांदा पिकवला, पण बाजारात सध्या कांद्याला (Onion) कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्यालाच नव्हे तर इतर शेतीमालालाही योग्य भाव मिळत नाही. अनेकदा आंदोलने करुन, राज्य सरकारकडे मागण्या, विनवण्या करुनही राज्य सरकार मात्र शेतकऱ्यांवर आश्वासनांचा पाऊस पाडत आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांपर्यंत कोणतीही मदत पोहचत नसल्याचा खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
अशा निष्क्रिय राजकीय पुढाऱ्यांना यापुढे गावात बंदी घालण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. तसेच, महाराष्ट्रातील सर्वच गावातील गावकऱ्यांनी नेते बंदी करत पुढाऱ्यांनी, लोकप्रतिनीधींनी शासनाला जाब विचारायला हवा; असे मत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. (Nashik Politics)
''आजपासून आमदार, खासदार, मंत्री, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी मुंजवाड गावात प्रवेश करु नये; प्रवेश केल्यास त्यांच्यावर कांदा फेकून निषेध केला जाईल,''अशा आशयाचे फलक गावाच्या चारही बाजूला लावत राज्य सरकारचा निषेध केला आहे. शेतकरी क्रांती मोर्चा व राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी लोकप्रतिनिधींना ही गावबंदी केली आहे. त्यांनी लावलेल्या या फलकाची मात्र जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. (Onion farmers)
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.