कुलसचिव व मुलाची हत्या करून ९६ लाखांचे शेअर विकले

३ जिल्हे, ३६ तासांच्या तपासातून पोलिसांनी उलगडला पिता-पुत्राच्या खुनाचा गुंता.
N R Kapadnis & Dr Amit Kapadnis
N R Kapadnis & Dr Amit KapadnisSarkarnama

नाशिक : चार फ्लॅट, पॅाश एरीयात बंगला, लाखोंचे शेअर्स आणि पैसा कावेबाज शेजाऱ्याच्या नजरेत आणि घात झाला. या मालमत्तेच्या हव्यासातून मुक्त विद्यापिठाचे (Open University) निवृत्त कुलसचिव. त्यांच्या डॅाक्टर मुलाला आपले प्राण गमवावे लागले. पोलिसांनी (Police) नाशिक, पालघर आणि नगर अशा तीन जिल्ह्यात घटलेल्या गुन्ह्याचा क्राईम सीन उभा करून गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

N R Kapadnis & Dr Amit Kapadnis
भाजप नगरसेविका म्हणते, निवडणूक लढेन... पण दुश्मनी करणार नाही!

मालमत्तेच्या लोभातून माजी कुलसचिव नानासाहेब रावजी कापडणीस (वय ७०) व त्यांचा मुलगा डॉ. अमित (वय ३५) या बाप-लेकाचा आठवडाभरात खून करण्यात आला. त्यांचे मृतदेह पालघर व नगर जिल्ह्यात निर्जनस्थळी जाळून त्यांची विल्हेवाट लावली. यादरम्यान त्यांच्या मोबाईलवरून ऑनलाइन ट्रँन्झॅक्शनद्वारे त्यांचे ९६ लाखांच्या शेअर्सची विक्री केली. संशय येऊ नये यासाठी त्या रकमेचा परस्पर व्यवहार करीत काही देणी चुकवीली. अतिशय थंड डोक्याने हा दुहेरी खून केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. यासंदर्भात राहुल गणपत जगताप (वय ३६) यास पोलिसांनी अटक केली.

N R Kapadnis & Dr Amit Kapadnis
काम दिसेना, मात्र फडणवीसांनी नेमलेल्या कंपनीला हवेत ५५ कोटी!

पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी दुहेरी खून प्रकरणासंदर्भात बुधवारी माहिती दिली. ते म्हणाले, की मृत कापडणीस पिता-पुत्र आणि संशयित जुनी पंडित कॉलनीत आनंद गोपाळ पार्क येथे राहायचे. संशयित राहुल जगताप याने इमारतीत राहणाऱ्या डॉ. अमित कापडणीस यांच्याशी झालेल्या तोंडओळखीतून या कुटुंबाच्या प्रॉपर्टीची माहिती घेत १६ ते १७ डिसेंबरला नानासाहेब कापडणीस यांचा पहिल्यांदा खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह पालघर जिल्ह्यातील जव्हार-आंबोलीदरम्यान जाळून त्या भागातील दरीत फेकून दिला. त्यानंतर दहा दिवसांनंतर २६ ते २७ डिसेंबरच्या दरम्यान त्यांचा मुलगा डॉ. अमित याचा खून करून त्यांचाही मृतदेह स्पिरिट टाकून जाळला. जाळलेला मृतदेह राजूर (नगर) जिल्ह्यात निर्जन भागात फेकून दोन्ही खुनांचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

मृताच्या नावाने आरटीजीएस

मृत कापडणीस कुटुंबाची शहर-जिल्ह्यात कोट्यवधींची प्रॉपर्टी आहे. ९६ लाखांचे शेअर, ५० लाखांच्या आसपास मुदतठेवी, पंडित कॉलनीत चार सदनिका, देवळाली भागात रो-हाउस, नानावली भागात गाळा, याशिवाय गंगापूर रोडला सावरकरनगर भागात तीनमजली इमारतीचे काम सुरू आहे. नानासाहेब कापडणीस यांच्या खुनानंतर संशयिताने त्यांच्या मोबाईलद्वारे डिमॅट खात्यावरून त्यांचे ९६ लाखांचे शेअर विकून कुणाला संशय येऊ नये म्हणून त्यातील काही रक्कम त्यांचा मुलगा अमित याच्या खात्यावर टाकली. थंड डोक्याने कामकाज करीत दोन्ही खुनांच्या गुन्ह्यात गुंगारा देत राहिला. शेअर विक्रीनंतर त्याने मृत कापडणीस यांच्या डिमॅट खात्याला जोडलेल्या मोबाईलच्या माध्यमातून लाखोंची रक्कम आरटीजीएस केली.

असा झाला उलगडा

मृत कापडणीस यांची मुलगी मुंबईत नोकरीला असल्याने त्यांची पत्नी मुलीसोबत मुंबईत राहायची, याची संशयिताला माहिती नव्हती. त्यामुळे कापडणीस पिता-पुत्राच्या खुनानंतर प्रॉपर्टी आपलीच होईल, या लोभामुळे त्याने कृत्य केल्याचा पोलिसांचा संशय आहे. मात्र यादरम्यान एक घटना घडली. त्यांच्या मुलीने वडिलांच्या मोबाईलवर फोन केला पण संशयिताला त्यांना पत्नी व मुलगी आहे, हे माहिती नसल्याने तो गांगरला. चुका करत गेला. त्यांच्या मुलीने सरकारवाडा पोलिस ठाण्यात वडील व भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यावर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे माहिती घ्यायला सुरवात केली. बेपत्ता कापडणीस यांच्या शेअर विक्रीची रक्कम प्रदीप जगन्नाथ शिरसाठ नावाच्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी शिरसाठची चौकशी केली असता त्याने मी मॅनेजर असून, मालक राहुल जगताप यांच्या सांगण्यावरून ही रक्कम वळविल्याची माहिती दिली. त्यानंतर राहुल जगताप हा पोलिसांच्या जाळ्यात आला.

दहा दिवसांची कोठडी

पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे, सहाय्यक निरीक्षक यतीन पाटील, पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे, पोलिस नाईक थेटे, लोंढे, पवार, भोये, खाडे आदींच्या पथकाने हा तपास केला. संशयिताच्या प्राथमिक जबाबातील माहितीची पडताळणी करीत, दोन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जात तेथील गुन्ह्याची माहिती घेत आर्थिक व्यवहाराची जुळवाजुळव केली. बुधवारी दुपारी न्यायालयापुढे हजर केले असता संशयित जगताप याला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in