Eknath Shinde: विनाअनुदानित शिक्षकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साकडे!

विनाअनुदानित शिक्षक संघर्ष समितीतर्फे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
CM Eknath Shinde with teachers association.
CM Eknath Shinde with teachers association.Sarkarnama

संगमेश्वर : राज्यातील (Maharashtra) विनाअनुदानित शिक्षकांच्या (Teachers) प्रश्नांबाबत शिक्षकभारती विनाअनुदानित (Unaided) संघर्ष समितीतर्फे राज्याध्यक्ष जयवंत भाबड व शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेऊन चर्चा करत मागण्यांचे निवेदन सादर केले. दिर्घकाळ रेंगाळलेल्या प्रश्नांवर डबल इंजीनचे सरकार लक्ष घालेल का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. (Unaided institutes teachers issue are pending since long time)

CM Eknath Shinde with teachers association.
Nana Patole: नाना पटोले देतील का नाशिक काँग्रेसला अध्यक्ष!

यावेळी दिलेल्या निवेदनाचा आशय असा, महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिक्षणमंत्र्यांनी अनुदान, जुनी पेन्शन अशा एकाही विषयावर अडीच वर्षांत एकही निर्णय केला नाही. शिक्षण खात्याला मंत्री दिले नाहीत. त्यामुळे तत्काळ शिक्षणमंत्री द्यावेत, १२, १५ तसेच २४ फेब्रुवारी २०२१ च्या शासननिर्णयात विनाकारण त्रुटी दाखवून शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व वर्गतुकड्यांना अपात्र तथा त्रुटीत काढले गेले.

CM Eknath Shinde with teachers association.
Dr. Bharti Pawar: केंद्रीय मंत्री भारती पवार यांना कांदा प्रश्नावर शेतकऱ्यांचा सवाल!

त्रुटीपात्र शाळांची यादी घोषित करून निधी वितरणाचा शासन आदेश तत्काळ काढणे, अघोषित शाळा ही पुणे स्तरावरून घोषित झाल्यापासून मंत्रालयास्तरवर अनुदानास पात्रतेच्या प्रतीक्षेत असून, अघोषित शाळा निधीसह घोषित करणे. सर्व अघोषित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना १५ नोव्हेंबर २०११ च्या शासन आदेशानुसार प्रचलित धोरणाने अनुदान देणे व जुनी पेन्शन योजना लढा दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

पंजाब, छत्तीसगड, राजस्थान, गोवा या राज्यांत जुनी पेन्शन लागू करण्यात आली आहे. त्या धर्तीवरदेखील जुनी पेन्शन योजना लागू करावी. अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षण सचिव रणजितसिंह देओल यांना फोन करून त्रुटीशाळा, अघोषित शाळा, प्रचलित अनुदानाबाबत माहिती मीटिंगमध्ये सादर करण्याचे सांगितले. जुनी पेन्शनबाबत अर्थमंत्री, अर्थसचिव यांच्याबरोबर बैठकीचे नियोजन करू, असे आश्वासन दिल्याचे श्री. भाबड यांनी सांगितले. या वेळी कार्याध्यक्ष राहुल पाटील, तुषार अहिरे, राहुल वाडिले उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com