Shivsena; `उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत, भविष्यातही तेच राहतील`

बंडखोर खासदार गोडसे म्हणतात, शिवसेनेचे संपुर्ण कुटूंब पुन्हा एकत्र यावे असे प्रयत्न.
Uddhav Thakrey-Hemant Godse
Uddhav Thakrey-Hemant GodseSarkarnama

नाशिक : शिवसेनेतून (Shivsena) पडून संसदेत स्थापन केलेल्या वेगळ्या गटात सहभागी झालेल्या खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. भविष्यात देखील राहतील. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना पक्षप्रमुख हे सर्व पुन्हा एकत्रयेऊन कुटुंबाप्रमाणे रहावेत असे प्रयत्न करीत राहणार आहोत, असे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. (We all will try for Shivsena family shall be come to gather again)

Uddhav Thakrey-Hemant Godse
दोन आमदार निवडीची शिवसैनिकांमध्ये ताकद

शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरनीय उद्धव ठाकरे यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो` अशी सुरवात करीत खासदार गोडसे म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून समाजाची मोठी सेवा घडो. केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशाची सेवा त्यांच्या हातून होवे, या माझ्या भावना आहेत.

ते म्हणाले, शिवसेनेचे पक्षप्रमुख पद अद्याप उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. यापुढेही राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे काही स्वतःचे पद सांगितले आहे, ते पक्षाचे मुख्य नेते असे सांगितलेले आहे. आम्ही देखील हा सर्व परिवार एकत्र यावा असाच प्रयत्न करतो आहे.

Uddhav Thakrey-Hemant Godse
नवा आदेश, नवीन पालकमंत्री येईपर्यंत कामे थांबवा!

भविष्यात मुख्यमंत्री नाशिकला आल्यास त्यांच्या दौऱ्याला आम्ही विरोध करू, असे शिवसेनेच्या शहरातील नेत्यांनी जाहीर केले आहे. याबाबत आपली काय भूमिका असेल, याबाबत ते म्हणाले, सध्या तरी मुख्यमंत्री हेलीकॅाप्टरने येणार आहेत, ते मालेगाव, नांदगाव, येवला आणि संभाजीनगर असा तो दौरा आहे. नाशिकला आम्ही त्यांची वेळ मागतो आहोत, मात्र त्यांच्या वेळापत्रकानुसार वेळ मिळाली तर नक्कीच आम्ही त्यांना भेटू. मुख्यमंत्री जेव्हा येतात, तेव्हा लोकांचे प्रश्न, विकासकामे याबाबत त्यांच्याशी चर्चा होतो. त्यामुळे असा विरोध करणे योग्य वाटत नाही.

खासदार गोडसे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांचा गट असे संबोधन न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन निर्माण झालेली संघटनाअसा उल्लेख हवा. शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जायचे सांगितले होते.

उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत यांनी शिंदे यांच्याबाबत बोलताना, दुसऱ्या क्रमांकाचे पद दिलेल्या शिवसेनेतील नेत्यांनी आम्हाला दगा दिला. त्यांच्या कपाळावरचा शिक्का कधीही पुसला जाणार नाही. जे सोडून गेलेत, तो सगळा पालापाचोळा होता. यावर मात्र गोडसे यांनी प्रतिक्रीया न देता भविष्यात आम्ही सगळेच उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री शिंदे हे सर्व पुन्हा एकत्र यावेत असे प्रयत्न करीत आहोत, असे सांगितले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in