आजची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची राहिली आहे काय?

आमदार नितेश राणे म्हणतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेशी संबंध नाही.
Nitesh Rane & Uddhav Thakre
Nitesh Rane & Uddhav ThakreSarkarnama

मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख म्हणुन जे भाषण उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांनी केले आहे. त्यात ज्या काही आठवणी सांगितल्या, त्याबाबत त्यांनी ह्रदयाला स्मरून खरं सांगावं की, ज्या ज्या घटना ते बोलताहेत त्या खऱ्या आहेत का?. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते शिवसेना उभी करेपर्यंत उद्धवजींचा त्या घटनांशी काहीही संबंध नव्हता, असा दावा भाजपचे आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. (Nitesh Rane Criticised Uddhav Thakrey on his speech)

Nitesh Rane & Uddhav Thakre
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या मतांत अजिबात फाटाफुट होणार नाही!

ते म्हणाले, जुन्या कोणत्याही शिवसेना नेत्यांना विचारू शकता. हा माणुस कॅमेऱ्याच्या पलिकडे कधी बघायचा नाही. शिवसेना नावाच्या संघटनेशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. शिवसेना किंवा शविसेनाप्रमुख बाळासाहेब हे हिदुत्वाचे बाप आहेत, हे आम्हाला माहिती आहे. मात्र तुम्ही सेक्युलर यांचे जे बाप आहेत त्याच्या कुशीत जाऊन हिंदुत्वाच्या बापाला का धोका दिला, हे आपण ५६ व्या वाढदिवसानिमित्त हे सांगितले पाहिजे ना?.

Nitesh Rane & Uddhav Thakre
'अग्निवीरांना आगित जाळण्याचे पाप भाजप करत आहे!'

श्री. राणे म्हणाले, आजची शिवसेना शिवसैनिकांची राहिली आहे काय?. आजची शिवसेना बाळासाहेबांची राहिली आहे काय?. आजची शिवसेना आनंद दिघे साहेबांची राहिली आहे काय?. याच उत्तर उद्धव ठाकरे यांनी खरे तर आज आपल्या भाषणात द्यायला पाहिजे होते.

ते पुढे म्हणाले, आज शिवसेना गेले अडीच वर्षे सत्तेत आहे. या कालावधीत मुळचा शिवसेना कार्यकर्ता तुम्हाला कुठे तरी दिसतो आहे का?. दिसला असता तर आजच्या शिवसेना कार्यक्रमाची सुरवात अनिल देसाई यांनी नव्हे तर एकनाथ शिंदे यांनी केली असती. आजच्या कार्यक्रमात आजुबाजुला जुने शिवसैनिक बसले असते. आज जसा सचिन अहिर यांचा उल्लेख केला, कसा जुना कुठचा शिवसैनिक असेल त्याचा उल्लेख झाला असता. शिवसेनेच्या ज्याने घाम गाळला, रक्त गाळले त्याला उमेदवारी दिली असती, तर खऱ्या अर्थाने अब तक छप्पन्न बोलायचा अधिकार असता.

केंद्रातील भाजप सरकारचे धोरण आणि त्यातून सामान्यांचे झालेले नुकसान याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाचाही राणे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ज्या वीस बावीस आमदारांचा ठाकरे यांनी उल्लेख केला, ते आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून निवडून आलेले आहेत. या आमदारांच्या बॅनरवर नरेंद्र मोदी यांचा फोटो नसता तर आज जे बावीस तेवीस आमदार बोलतात, त्यांना त्याचा अधिकार पण नव्हता.

जर तुम्हाला केंद्र सरकार एव्हढे वाईट वाटत असेल तर तुमच्या मेहुण्याला वाचविण्यासाठी, स्वतःची कामे करण्यासाठी कशाला त्यांना पायघड्या घालता. कशाला शिवसेना कार्यकर्त्यांना गाफील ठेवता, असा प्रश्न देखील त्यांनी केला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com