विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या मतांत अजिबात फाटाफुट होणार नाही!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्वाळा, शिवसेनेत आता कोणीही गद्दार राहिलेला नाही.
Uddhav Thakrey
Uddhav ThakreySarkarnama

मुंबई : विधानपरिषदेचे मतदान उद्या होत आहे. त्याच्या पुर्वसंध्येला शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांनी राज्यसभेला शिवसेनेचे एकही मत फुटलेले नाही. उद्या देखील फाटाफूट होईल अशी शक्यता नाही. शिवसेनेत कोणीही गद्दार राहिलेला नाही, असा विश्वास व्यक्त केला. (All Shivsena voters intact in Rajyasabha election)

Uddhav Thakrey
विधानपरिषद निवडणुकीतही केंद्रीय यंत्रणांचा दबाव; आमदारांना थेट फोन !

आज मुंबईत शिवसेना आमदारांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते आणि आमदार उपस्थित होते.

Uddhav Thakrey
'अग्निवीरांना आगित जाळण्याचे पाप भाजप करत आहे!'

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत जे झाले ते बरे नव्हते. त्याबाबत मी ठामपणाने सांगेन की, गेल्या राज्यसभा निवडणुकीत जे झाले, ते आपले अर्थात मी स्वतःचे म्हणतो. स्वतःचे म्हणन्यामध्ये आमदार राजकुमार यांसह आपले सहकारी अर्थात शिवसेनेचे सर्व सहकारी म्हणून आलात. तेव्हा मी त्याच्यात आमचे म्हणतो, म्हणजे मी त्यात तुम्हाला समाविष्ट केलेले आहे.

ते पुढे म्हणाले, की त्यामुळेच मी तुम्हाला पुन्हा एकदा आमचे सहकारी म्हणणार नाही. तुम्ही आमचेच आहात. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानात एकही मत फुटलेले नाही. एकही मत फुटलेले नाही हे मी ठापमणे सांगतो. मग फुटलं कोणतं. आहे, त्याचा सुद्धा अंदाज लागलेला आहे. तो देखील अंदाज लागलेला आहे. कोणी काय काय कलाकाऱ्या केल्या, तो देखील अंदाज आलेला आहे.

ते म्हणाले, या सगळ्यांचा हळु, हळु, हळु सगळे पुढे येईल तसा उळगडा होत जाईल. त्यामुळे उद्या विधानपरिषदेच्या मतदानात फाटाफुटीची शक्यता मला अजिबात वाटत नाही. कारण शिवसेनेमध्ये असा गद्दार मनाचा कोणी राहिलेला नाही. अजिबात राहिलेला नाही. मला यानिमित्ताने शिवसेनाप्रमुखांनी मागेच एकदा अशी फाटाफुटीचे राजकारण बघत आलेलो आहोत. भोगत आलेलो आहोत.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in