
नाशिक : कोणीही काळजी करू नये. शिवसेनेचे (Shivsena) निवडणूक चिन्ह धनुष्यबाण शिवसेनेकडेच राहील. याबाबत बंडखोरांनी काहीही दावा केला, तरी त्यात दम नाही. यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) आज मोठी घोषणा करतील, अशी माहिती खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. (Shivsena`s election symbol will be with Uddhav Thakrey Only)
खासदार संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नीष्ठा यात्रेद्वारे शिवसेनेने महाराष्ट्रासाठी काय केले?. सध्या राज्यावर कोणते राजकीय संकट येऊ घातले आहे, बंडखोरांनी काय केले याचा सर्व हिशेब मांडला जाईल. राज्यातील जनता बंडखोरांच्या बनवाबनवीला भुलनार नाही, असा दावा त्यांनी केला.(Shivsena Latest Marathi News)
ते म्हणाले, शिवसेना फोडणे हे भाजपचे मोठे षडयंत्र आहे. भाजपमध्ये ते करण्याची क्षमता नाही. त्यामुळे त्यांनी नेमलेला मुख्यमंत्री शिवसेनेचा, विधानसभा अध्यक्ष शिवसेनेचा केला. कारण शिवसेना फोडायला शिवसैनिकच लागतो. जे फुटले त्यांनी शिवसेनेला व शविसेनाप्रमुखांच्या मुलाशी दगा रण्याचे पाप केले आहे. त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान त्यांनी बंडखोरांना दिले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेला गळती लागली. ती भरून काढण्यासाठी खासदार राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. प्रत्येकवेळी नाशिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. त्यामुळे नांदगाव, मालेगावमध्ये काय चाललंय, याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. नाशिक, नांदगाव, मालेगाव मधील प्रत्येक शिवसैनिक आज पक्षाच्या पाठीशी उभा आहे. नाशिकचे सगळे नगरसेवक माझ्या सोबत आहेत, त्यामुळे नाशिकपासून हि सुरवात करतो आहे.
नाशिकची शिवसेना जागच्या जागी आहे. शिवसेनेने तसे शिवसैनिक घडविले आहेत. राज्यातील लोक वाट पाहते आहे, त्यामुळे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचणार आहोत. आम्ही शिवसेनेसाठी काय केलं. काय करतोय हे महाराष्ट्र जाणतोच. राष्ट्रवादी निधी देत नाही. मुख्यमंत्री भेटत नाही, अशी करणे बंडखोरांनी दिली.
मात्र सत्तांतराला कारण एकच आहे ते म्हणजे शिवसेना, भाजप पक्षाला शिवसेना पक्ष फोडायचा नाही तर संपवायचा आहे, हेच भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. हिंदुत्वादी म्हणवून घेणाऱ्या ४० आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, बंडखोर आमदारांनी स्वतःच अस्तित्व निर्माण करा, महाराष्ट्राची जनता जागरूक आहे, चाणाक्ष आहे, महाराष्ट्रात जे घडलय ते जनता जाणून आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
....
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.